अमडापूर येथील मन नदीच्या खाेलीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:32 AM2021-03-25T04:32:34+5:302021-03-25T04:32:34+5:30
अमडापूर येथील मन नदीमध्ये गाळ, गवत व घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नदी पात्रात पावसाचे पाणी पडून पूर ...
अमडापूर येथील मन नदीमध्ये गाळ, गवत व घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नदी पात्रात पावसाचे पाणी पडून पूर आल्यास या नदीवर असलेल्या पुलावरून पाणी जात हाेते. कित्येक वेळा गावकऱ्यांना हा पूल बंद होत असल्याने त्रास सहन करावा लागत होता. सध्या तीन ते चार दिवसांपासून माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत मन नदीच्या पात्रातील साचलेला गाळ व घाण काढून खोलीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू झाल्याने या मन नदीने आता मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मन नदीचे उगम कव्हळा येथून बाळापूर पर्यंत आहे. ही मन नदी चिखली तालुक्यातील अमडापूर गावाला लागून आहे. या मन नदीच्या पात्रातील वाहून आलेला गाळ व घाण तसेच गवताने तुडुंब भरून गेल्याने या नदी पात्रामध्ये दर वर्षी पावसाळ्यामध्ये पूर आला तेव्हा या नदी पात्रावर असलेल्या पुलावरून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहते. त्यामुळे या अमडापूर व जानेफळ मार्गाने जाणारी वाहने बंद हाेतात. नागरिकांना सुद्धा गावामधून बसस्थानक परिसरात जाण्यासाठी कसरत करावी लागत असे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरून मन नदी पात्राचे खोलीकरण व रूंदीकरण अडीचशे मीटरचे काम सुरू करून नदी मधून साचलेला गाळ व घाण जलद गतीने काढणे सुरू केले आहे.