रायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास प्रारंभ - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:27+5:302021-03-19T04:33:27+5:30
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करत असून वेळोवेळी लाॅकडाऊनचा कालावधीसुद्धा वाढविला जात आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करत असून वेळोवेळी लाॅकडाऊनचा कालावधीसुद्धा वाढविला जात आहे. सोबतच कोरोना लसीकरण केले जात आहे शहरानंतर ग्रामीण भागातसुद्धा कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. १५ मार्च रोजी रायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोदावरी भगवानराव कोकाटे यांना कोरोनाची लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य तथा टिटवी सरपंच भगवानराव कोकाटे यांनी लस घेतली. पात्र नागरिकांनी आरोग्य केंद्रात येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश सानप यांनी कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे व घराबाहेर पडताना मास्कचा वापर करून सुरक्षित अंतर पाळण्याचे सांगितले.