सैनिकांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी समितीचे गठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:19+5:302021-09-16T04:43:19+5:30

या समितीच्या माध्यमातून आजी, माजी सैनिकांच्या जमिनीवरील अतिक्रमणाचे प्रश्न, सैनिकांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्याचार दूर करणे, ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर ...

Committee formed to protect the families of soldiers | सैनिकांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी समितीचे गठण

सैनिकांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी समितीचे गठण

Next

या समितीच्या माध्यमातून आजी, माजी सैनिकांच्या जमिनीवरील अतिक्रमणाचे प्रश्न, सैनिकांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्याचार दूर करणे, ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिका यांच्या बाबतच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आजी, माजी सैनिकांच्या कुटुंबीयांवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सैनिक सेलही स्थापन करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया आहेत. सदस्य म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर भास्कर निंबाजी पडघान, आर्थिक गुन्हे शाखेच्या एपीआय यांचा समावेश आहे.

दरम्यान तालुकास्तरावरही समितीमध्ये सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून नायक हिम्मतराव उबरहंडे, सुभेदार अशोक भुतेकर, हवालदार सुभाष इंगळे, हवालदार भानुदास गोडसे, नायब सुभेदार दत्तात्रय जाधव, हवालदार फकिरा जाधव, सु. मे. ऑ. लेफ्ट. जी. एस. बगाडे, हवालदार संजय ससाणे, हवालदार विष्णू पहुरकर, हवालदार सदाशिव घाटे, हवालदार गोपाल दवंगे, हवालदार भास्कर मालोकार, नाईक निरंजन सावळे यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सूत्रांनी दिली.

Web Title: Committee formed to protect the families of soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.