शेतमालाच्या दर्जावर समितीची नजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:24 AM2017-09-30T00:24:05+5:302017-09-30T00:24:12+5:30
बुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीला नॉन एफएक्यू दर्जाचा माल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जात असली, तरी विक्रीला आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांची समिती नेमण्यात आली आहे. शेतमालाच्या दर्जावर ही समिती नजर ठेवत असून, या समितीने प्रमाणित केल्यावरच त्या मालाच्या लिलावाला परवानगी मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीला नॉन एफएक्यू दर्जाचा माल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जात असली, तरी विक्रीला आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांची समिती नेमण्यात आली आहे. शेतमालाच्या दर्जावर ही समिती नजर ठेवत असून, या समितीने प्रमाणित केल्यावरच त्या मालाच्या लिलावाला परवानगी मिळते.
जिल्ह्यात तुरीचे चांगले उत्पादन झाल्यामुळे अद्यापही तुरीची आवक बाजार समितीमध्ये होत आहे. तुरीला किमान आधारभूत किंमत मिळावी म्हणून जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू केली. त्याचबरोबर या हंगामातील मूग, उडीद या पिकांची आवक वाढत आहे. मूग व उडिदासह सर्व मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी उत् पन्न बाजार समित्यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्याकडून सूचना दिलेल्या आहेत; मात्र नॉन एफए क्यू म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता कमी असलेल्या मूग, उडीद व इतर काही मालाचीही आवक होत आहे. त्यामुळे असा शेतमाल खरेदी करण्याला अडचणी येत आहेत, त्यामुळे नॉन एफएक्यू दर्जाचा शेतमाल तपासण्यासाठी पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणेच्यावतीने प्रत्येक तालुक्यात एक तालुकास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून बाजार समितीमध्ये येणार्या शेतमालाचा दर्जा तपासण्यात येतो. बाजार समितीला नॉन एफएक्यू दर्जाचा माल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जाणार असली, तरी विक्रीला आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांची ही तालुकास्तरीय समिती आहे. या समितीने शे तमालाचा दर्जा प्रमाणित केल्यावरच त्या मालाच्या लिलावाला परवानगी मिळणार आहे; मात्र ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ असल्याने शेतकरी एवढा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे सध्या शेतमालाचा दर्जा तपासण्याची ही पक्रिया शेतमाल खरेदी- विक्रीसाठी अडचणीची ठरत आहे.
शेतमालाची खरेदी-विक्री खोळंबली
शेतमालाचा दर्जा तपासण्यासाठी तालुकास्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे; मात्र या सर्व प्रक्रियेला वेळ अधिक लागत असल्याने शेतकरी माल सोडून पैशांसाठी प्रतीक्षा करू शकत नाहीत. सुरुवातीला या समितीकडे शेतमाल तपासणीसाठी पाठविणे, त्यानंतर समितीकडून शेतमालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी प्रतीक्षा करणे, या सर्व प्रक्रियेला लागणारा वेळ व्या पारी व शेतकर्यांना परवडणारा नाही. त्यामुळे अनेक शेतकरी या प्रक्रियेतून जाण्यास तयार नसल्याने शेतमालाची खरेदी-विक्री खोळंबली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून शेतमालाचा दर्जा प्रमाणित केल्यानंतर खरेदी-विक्री होते.
- नानासाहेब चव्हाण,
जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा.