अभ्यास गटांशी समन्वय साधण्यासाठी समिती गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:02 PM2020-09-12T12:02:57+5:302020-09-12T12:03:11+5:30
या समितीला आपला अहवाल १५ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.
बुलडाणा : नविन राष्टीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने विवध अभ्यासगट नियुक्त केले आहेत. या अभ्यास गटांशी समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने समितीची स्थापना केली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे समितीचे अध्यक्ष आहे. या समितीला आपला अहवाल १५ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे. याविषयीचा शासनादेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ८ सप्टेंबर रोजी जारी केला आहे.
नविन राष्टीय शैक्षणिक धोरणामधील शिफारशींच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध अभ्यास गटांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे तर सदस्यपदी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे राहुल कर्डीले, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट पुणेचे प्रभारी प्राचार्य विकास गरड, बालभारतीचे प्रभारी संचालक विवेक गोसावी, नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व अभ्यास गटांशी समन्वय साधुन, अहवाल तयार करण्यास मार्गदर्शन करणे, अभ्यासगटांचे अहवाल संकलीत करणे, राज्याचा शैक्षणिक धोरणाबाबतचा मसुदा ही समिती तयार करणार आहे. या समितीचा कार्यकाळ दोन महिन्यांचा राहणार आहे. समितीचा खर्च हा जिल्हा परिषदेच्या निधीतून किंवा बालभारतीच्या उत्पन्नातून करावा असे शासनाने म्हटले आहे. या समितीला आपला अहवाल १५ आॅक्टोंबर पर्यंत शासनास सादर करावा लागणार आहे.