शेतमाल व्यापाऱ्यांना नियमात शिथिलतेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:13+5:302021-05-04T04:15:13+5:30
त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकता यावा यासाठी शेतमाल व्यापाऱ्यांना बंदच्या नियमात शिथिलता देण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या निर्देशानुसार नुकतेच जिल्हाधिकारी ...
त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकता यावा यासाठी शेतमाल व्यापाऱ्यांना बंदच्या नियमात शिथिलता देण्याची आवश्यकता आहे.
शासनाच्या निर्देशानुसार नुकतेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कृषी विषयक दुकानांना औषधी बियाणे विक्रेत्यांना, तसेच कृषी साहित्य विकणाऱ्या दुकानदारांना नियमात शिथिलता देऊन सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.
त्याप्रमाणेच शेतीमाल खरेदी विक्रीची मुभा देण्यात यावी. मका, तूर, सोयाबीन, गहू, कापूस यासारखा माल शेतकऱ्यांना विकायचा आहे. परंतु, सध्याच्या बंदमुळे, तसेच वेळेच्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यास व शेतमाल व्यापाऱ्यांना खरेदी करण्यास अडचणी येत आहे. कोरोना काळातील नियमांचे पालन करून शेतमाल खरेदी विक्रीसाठी मुभा देण्यात यावी, अशी मागणी मोताळा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
यासंदर्भात मोताळा तहसीलदार समाधान सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता सध्याच्या नियमात शेतीमाल खरेदी-विक्री संदर्भात स्पष्टता नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी रास्त असून, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना याविषयी अवगत केले जाईल, असे त्यांनी सांगितले.