सर्वसामान्यांना दुचाकी बाळगणे परवडेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:44+5:302021-07-14T04:39:44+5:30

बुलडाणा : महागाईच्या या कचाट्यातून वाहन दुरूस्ती व त्यासाठी लागणारे साहित्यही सुटले नाही. दुचाकीच्या सर्व्हिसिंगपासून ते इतर दुरूस्तीचा खर्चही ...

The common man can afford to have a bike | सर्वसामान्यांना दुचाकी बाळगणे परवडेणा

सर्वसामान्यांना दुचाकी बाळगणे परवडेणा

Next

बुलडाणा : महागाईच्या या कचाट्यातून वाहन दुरूस्ती व त्यासाठी लागणारे साहित्यही सुटले नाही. दुचाकीच्या सर्व्हिसिंगपासून ते इतर दुरूस्तीचा खर्चही साधारणतः ३० ते ४० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे बाईक रायडर्सच्या खिशाला चांगलीच झळ बसत असून, सर्वसामान्यांना दुचाकी बाळगणे परवडत नसल्याचे चित्र आहे.

कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण अर्थचक्र बदलले आहे. प्रत्येक क्षेत्राला आर्थिक व इतर प्रकारचा फटका बसल्याचे दिसून येते. वाहन क्षेत्रावरही चांगलाच परिणाम झालेला आहे. वाढत्या महागाईमुळे वाहनासाठी लागणारे विविध साहित्यांचे दर कंपन्यांकडून वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकीची सर्व्हिसिंग असो वा इतर कुठलीही दुरूस्ती करायची झाल्यास मागील वर्षीपेक्षा यंदा जास्त पेैसे मोजावे लागत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहन दुरूस्तीचे कामेही जास्त असतात. लॉकडाऊनमध्ये दुचाकी दुरूस्ती करणाऱ्या कारागिरांच्या हाताला ही काम नव्हते, आता सर्व नियम शिथिल झाल्याने दुचाकी सर्व्हिसिंग व दुरूस्तीची कामे वाढलेली आहेत. परंतु सर्व्हिसिंग व दुरूस्तीसाठी दुचाकी ॲटोमोबाईलवर घेऊन गेल्यानंतरच हे वाढलेले दर कळतात. त्यामुळे दुचाकी चालवणे आता महाग झाल्याचे दिसून येत आहे.

प्रत्येक घरात दुचाकी

दुचाकी वापरणारा वर्ग म्हणजे सर्वसामान्य असतो. आता शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही प्रत्येक घरात दुचाकी वाहन आहेच. शिवाय बाहेर कुठल्याही कामासाठी जायचे असेल, तर दुचाकी शिवाय होत नाही. घरातील मुलेही दुचाकी शिवाय बाहेर पडत नाहीत. त्यामुळे दुचाकीचा होणारा वापर बघता, त्यासाठी लागणारा खर्चही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.

साहित्यांच्या किमतीत ही वाढ

दुचाकी दुरूस्ती करणाऱ्या कारागिरांनी आपली मजुरी वाढविली नाही, तर दुचाकीला लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत ही वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकी दुरूस्तीचा खर्च आता वाढला आहे.

-ज्ञानेश्वर देशमुख, ॲटोमोबाईल मालक.

कंपन्यांनी वाढविले दर

लॉकडाऊनमुळे सर्वांचेच आर्थिक नियोजन हुकले आहे. प्रत्येक क्षेत्रात दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे. दुचाकीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या किमती कंपन्यांकडूनच वाढविण्यात आलेल्या आहेत.

-माऊली देशमुख, ॲटोमोबाईल मालक व मेकॅनिकल.

कमी मजुरीत आम्हालाही परवडत नाही

वाढत्या महागाईमुळे आम्हालाही आमची मजुरी वाढवावी लागत आहे. पूर्वीच्या मजुरीमध्ये आता काम करणे परवडत नाही. त्यामुळे दुचाकी दुरूस्तीच्या प्रत्येक कामामागे कमी अधिक प्रमाणात दरवाढ झालेली आहे.

-अजय खिल्लारे, मेकॅनिकल.

असे वाढले मजुरीचे दर

मागील वर्षी आता

सर्व्हिसिंग : १५० २००

क्लच प्लेट : १०० १५०

कोनसेठ : ९० १५०

इंजिन काम : १००० १२००

शॉकअप ऑईल बदली १०० १५०

साहित्याच्या किमतीत अशी झाली वाढ

आईल (९०० एम. एल.) ३२० ३७८

ब्रेक लायनर १०० १५०

हेड लाईट ८० ११०

इंडिकेटर ५० ७०

बॅटरी ९०० १३००

जिल्ह्यातील एकूण वाहने : ४,९७,१९८

दुचाकींची संख्या : ३,९२,२४१

Web Title: The common man can afford to have a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.