सर्वसामान्य व्यक्ती हाच सेवेचा केंद्रबिंदू - राजेंद्र जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 04:44 PM2020-10-10T16:44:13+5:302020-10-10T16:44:49+5:30
Khamgaon Subdivisional Officer खामगाव येथील नवनियुक्त उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याशी साधलेला संवाद...
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : मानवी जीवनात तळागाळातील आणि वंचितांच्या सेवेला परमोच्च स्थान आहे. समाजातील शेवटचा घटक सुखी झाला की, समाज सुखी हीच आनंदमयी जीवनाची पहिली पायरी होय आणि म्हणूनच आपले पहिले प्राधान्य वंचित आणि सामान्यांच्या सेवेसाठीच आतापर्यंत राहीले आहे. या पुढेही राहणार आहे. खामगाव येथील नवनियुक्त उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याशी साधलेला संवाद...
कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत काय सांगाल?
कोरोना या विषाणू संसर्गाने जगभर थैमान माजविले आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचारीही या आजाराला बळी पडताहेत. खामगाव उपविभागीय कार्यालय त्याला अपवाद नाही. त्यामुळे कोरोना जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणीकडे आपले प्रामुख्याने लक्ष राहील.
खामगावातील भूखंड घोटाळ्यात अन्याय झालेल्यांना कसा न्याय द्याल?
खामगाव येथील भूखंड घोटाळ्याबाबत आपण ऐकूण आहोत. परंतु, सद्यस्थितीत या घोटाळ्यासंबंधित फाईल आपण पाहल्या नाहीत. त्यामुळे याबाबत आताच निश्चित काही असे सांगता येणार नाही. मात्र, या घोटाळ्याशी संबंधित सर्वच फाईलींच्या आपण खोलात जाणार आहोत. यातील अनियमिततांवर कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कारवाई करण्यासाठी आपण सदैव कटीबध्द आहोत.
भूखंड घोटाळ्यामुळे उपविभागाची राज्यात प्रतिमा मलिन झाली ?
खामगावात गाजलेल्या भूखंड घोटाळ्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असे म्हणता येणार नाही. काही चांगली कामेही या विभागात निश्चितच झाली आहेत. ज्या कुणी घोटाळा केला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सकारात्मक आणि प्रामाणिकपणे सामान्यांना न्याय देण्यासाठीच आपले प्राधान्य राहील.
समाजातील सर्वच दु:ख आपण एकाचवेळी नाहीशी करू शकत नाही. तेवढे सामर्थ्य कोणत्याही मनुष्यात नाही. परंतू सेवेला चांगल्या कर्माची जोड दिल्यास निश्चितच काही जणांच्या चेहºयावर आपण आनंद पसरवू शकतो. प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टीकोनातून अनेकांची दु:ख निश्चितच कमी होतात.
खामगाव उपविभागातील समस्या कशा सोडविणार ?
समस्या आणि संकटे कधीही एकटी येत नाहीत. त्याकेवळ खामगाव उपविभागातच आहेत, असेही नाहीत. शासकीय सेवेत सर्वत्रच समस्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवत, आपल्या कर्तव्याला प्रामाणिकपणे सामोरे गेलं की निम्या समस्या आपोआप सुटतात. उर्वरित समस्यांचा धैर्याने सामना करावा लागतो. त्यानंतर काही समस्या आपली पाठ सोडवितात. थोडक्यात सर्वांना समान न्याय हे तत्व अंगिकारत समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे. आपण या अगोदर खामगाव उपविभागात सेवा केली असल्याने येथील भौगोलिक परिस्थितीची तसेच जनसामान्यांची बºयापैकी माहिती आहे. त्याचा कामकाजात निश्चित फायदा होईल.