कॉमनवेल्थ, एशियन गेम्सवर लक्ष केंद्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:19+5:302021-08-23T04:36:19+5:30
या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघाकडून त्यांना देदीप्यमान यशाची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने आता आपण खेळाडूंचे प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि एकाग्रतेवर ...
या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघाकडून त्यांना देदीप्यमान यशाची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने आता आपण खेळाडूंचे प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि एकाग्रतेवर काम करत असल्याचे सांगितले. सातत्यपूर्ण यश मिळविण्यासाठी मैदानावर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, हे ते आवर्जून सांगतात. त्यांच्याच्या आधिपत्याखाळी प्रथमेश जावकार, मोनाली जाधव आणि आता मिहीर आपार यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा डंका वाजवला आहे. सध्या मार्गदर्शनात अलीकडील काळात बुलडाण्याच्या २७ मुलांनी राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या आहे तर दोन सुवर्ण, दोन रजत आणि एक कांस्य पदक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळविले आहे.
सध्या बुलडाण्यात ५० खेळाडूंना ते मोफत आर्चरीचे प्रशिक्षण देत आहेत. भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते बुलडाणा पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ते दाखल झाले. २०१२ पासून बुलडाण्यात त्यांनी गुणवान मुलांना हेरून आर्चरीचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. त्याचे दृश्य परिणाम आता दिसत आहे.
आता पुढील लक्ष्य आगामी कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्स असून त्यानंतर २०२३ मध्ये आर्चरी वल्ड कपच्या स्टेजेस सुरू होणार आहे. त्यामध्येही बुलडाण्याचे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा इलग यांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने आठवड्यातून तीन दिवस वेटट्रेनिंग, प्रायणायाम, धावण्याच्या व्यायामासह खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठीचे तंत्र विकसित करण्याबर आपण भर देत असल्याचे ते म्हणाले.