मराठा आंदोलनकर्त्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ समाज बांधव एकवटले

By विवेक चांदुरकर | Published: September 1, 2023 11:38 PM2023-09-01T23:38:38+5:302023-09-01T23:39:59+5:30

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाडी सराटी येथे गत चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते.

Community members united to protest against the lathis on the Maratha agitators | मराठा आंदोलनकर्त्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ समाज बांधव एकवटले

मराठा आंदोलनकर्त्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ समाज बांधव एकवटले

googlenewsNext

हनुमान जगताप 

मलकापूर: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाडी सराटी येथील आंदोलनकर्त्यांवर‌ पोलिसांनी लाठी हल्ला केला.त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असतांनाच विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूरात लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाज बांधव एकवटले व आज शुक्रवारी रात्री सामुहिक निषेध नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे.ओबीसी आरक्षणातूनच आरक्षण द्यावे अशी मागणी केली जात आहे.मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून समाजबांधवांनी संघर्ष कायमच आहे.  

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाडी सराटी येथे गत चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते.आज शुक्रवारी दुपारी त्या आंदोलनात सहभागी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात आबालवृद्धांना लक्ष करण्यात आले आहे.प्रामुख्याने महिलांवरही लाठीहल्ला केला गेला आहे.या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत ‌त्याच धरतीवर मलकापूरात आज शुक्रवारी रात्री मराठा समाज बांधव एकवटले आहेत. येथील तहसील चौकात आज शुक्रवारी रात्री मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन त्या लाठीहल्ल्याचा तिव्र निषेध नोंदवणला आहे.त्या लाठीहल्ल्याच्या चौकशीची व दोषींवर कारवाईची मागणी सामुहिक रित्या मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन केली आहे.‌ एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.... अशा आशयाच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन घेतलेल्या पवित्र्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.उशिरापर्यंत लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Community members united to protest against the lathis on the Maratha agitators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.