शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या : चेके पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:31+5:302021-03-24T04:32:31+5:30
देऊळगाव राजा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी, मका पिकांसह ...
देऊळगाव राजा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी, मका पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर राष्टवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन चेके पाटील यांनी देऊळगाव मही व परिसरातील सुरा, सरंबा, नागणगाव, निमगाव गुरू, नारायणखेड या गावाच्या शेतशिवारात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. दरम्यान, यासंदर्भाने तालुका प्रशासनाला निवेदन देऊन अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी गजानन चेके पाटील यांनी केली आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती नितीन शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजू चित्ते, सरपंच शिवाजी चेके पाटील, राजू सिरसाठ आदी उपस्थित होते.