अवकाळीने नुकसान झालेल्या शेतीपिकांना भरपाई द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:31 AM2021-03-22T04:31:33+5:302021-03-22T04:31:33+5:30
चिखली : जिल्ह्यात १८ व १९ मार्च रोजी अनेक ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक ...
चिखली : जिल्ह्यात १८ व १९ मार्च रोजी अनेक ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक गारपीट देखील झाली. यामुळे ऐन काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात अतीवृष्टीने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी देखील खरीप हंगामात अतिवृष्टी तसेच बोगस बियाणे यामुळे दुबार-तिबार पेरणी करावी लागली. त्यातच गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी रब्बीतील पिके चांगली असल्याने याच पिकांकडून शेतकºयांना आशा होती. गहू, हरबरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह इतर पिके ऐन काढणीला आलेली असताना जिल्हयात १८ व १९ मार्च रोजी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली आहे. यामुळे गहू, हरभरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना या नुकसानाची भरपाई न मिळाल्यास शेतकरी पूर्णपणे हतबल होऊन आत्महत्येचा मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. या कठीण परिस्थितीत शेतकºयांना आधार देण्यासाठी तातडीने नुकसानाचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
नुकसानाची पाहणी
‘स्वाभिमानी’चे राणा चंदन, शेख रफिक शेख करीम, राजेश गवई, महेंद्र जाधव, संतोष गवळी या पदाधिकाºयांनी मोताळा तालुक्यातील मूर्ती शिवारातील शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. राणा चंदन यांनी तात्काळ मोताळा तहसीलदार समाधान सोनुने यांना फोन करून पंचनामे करण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कृषी अधिकारी, तलाठी यांनी तात्काळ पंचनामे करण्यास सुरवात केली. दरम्यान, बाबुराव सोनुने यांच्या शेतातील अडीच एकर मका उद्ध्वस्त झाल्याने त्यांना धीर दिला.