सुकलेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:26 AM2017-08-19T00:26:30+5:302017-08-19T00:26:57+5:30
बुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने शेतकर्यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

ना.तुपकर यांनी शुक्रवारी खुपगाव, सव, किन्होळा आणि रुईखेड शिवारातील शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाण्याचे तहसीलदार सुरेश बगळे, तालुका कृषी अधिकारी अनिल भांबरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आय.एन.इंगळे, कृषी पर्यवेक्षक आर.टी.पवार, कृषी सहायक जितेंद्र केकाण उपस्थित होते. या पीक पाहणीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. या पत्रात ना.रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, विदर्भात मागील एक महिन्यापासून पाऊस नाही. पावसाअभावी शेतकर्यांची खरिपाची पेरणी वाया गेली आहे. बुलडाणा जिल्हय़ातील सोयाबीन, उडीद, मूग व का पूस पीक सुकून गेले आहे. अनेक शेतकर्यांनी अक्षरश: उभ्या िपकामध्ये नांगर घातले आहेत. मागील वर्षी शेतकर्यांच्या सोयाबीन व तुरीला भाव मिळाला नाही. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचाही शेतकर्यांना लाभ झाला नाही. त्यातच यावर्षी पुन्हा निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकर्यांसमोर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. सततचा दुष्काळ, कर्ज व नापिकीमुळे विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबता थांबेनात, असे असताना शे तकर्यांवर पुन्हा दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे.
यावर शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने शे तकर्यांच्या सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मु ख्यमंत्री ना.फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पीक पाहणी दौर्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पडोळ, कैलास जाधव आदी उपस्थित होते.