खासगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांमधील स्पर्धा संपुष्टात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 11:15 AM2021-06-05T11:15:15+5:302021-06-05T11:15:25+5:30

Covid center Buldhana : जिल्ह्यातील सहा पेक्षा अधिक कोरोना रूग्णालय बंद करण्यात आले आहेत

Competition among doctors of private covid center ends | खासगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांमधील स्पर्धा संपुष्टात 

खासगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांमधील स्पर्धा संपुष्टात 

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खासगी कोविड रूग्णालयांकडून रूग्णांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच, शासनाने कोरोना उपचाराचे दर ठरवून दिले. त्यानंतर जिल्ह्यातील सहा पेक्षा अधिक कोरोना रूग्णालय बंद करण्यात आले आहेत. परिणामी, खासगी डॉक्टरांमधील स्पर्धा संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणू संक्रमणाच्या दसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढीस लागली होती. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसताच, शासनाने खासगी दवाखान्यांना कोरोना उपचारासाठी परवानगी दिली. मात्र, रूग्णसेवेच्या या संधीचा काही खासगी रूग्णालयांकडून तसेच डॉक्टरांकडून दुरूपयोग सुरू झाला. अवाजवी बिल वसुलीतून रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणे सुरू झाले.खामगाव शहरातील काही डॉक्टरांच्या तक्रारीही वरिष्ठ स्तरावर पोहोचल्या. एका रूग्णालयांतील मंगळसुत्र गहाण ठेवल्याचे प्रकरणही चांगलेच गाजले होते.

स्पर्धेतून डॉक्टरांविरोधात झाल्या होत्या तक्रारी!
 वाढत्या स्पर्धेतून मध्यतंरी काही डॉक्टरांच्या तक्रारीही झाल्या होत्या. यामध्ये काही राजकीय नेत्यांना हाताशी धरत डॉक्टरांनी परस्परविरोधात तक्रारीही दाखल केल्या. 
  मात्र, आता दर निश्चितीनंतर खासगी कोविड रूग्णालये चालविणे परवडणारे झाले आहे. त्यामुळे खासगी कोविड रूग्णालये बंद पडत आहे. डॉक्टरांमधील स्पर्धा संपुष्टात आल्याचे दिसून येते.
 

Web Title: Competition among doctors of private covid center ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.