स्मार्ट ग्रामसाठी बुलडाणा जिल्ह्यातील १३ गावांत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 02:35 PM2019-08-25T14:35:00+5:302019-08-25T14:37:38+5:30
जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामसाठी जिल्ह्यातील १३ गावांमध्ये सुचरस निर्माण झाली आहे.
- नवीन मोदे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामसाठी जिल्ह्यातील १३ गावांमध्ये सुचरस निर्माण झाली आहे. दरम्यान, ग्रामिण भागाच्या विकासाच्या दृष्टीने स्मार्ट ग्राम ही संकल्पना अलिकडील काळात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. मध्यंतरी तेराही तालुक्यातून निवडण्यात आलेल्या १३ गावांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. आता जिल्हास्तरावरील स्मार्ट ग्रामची निवडप्रक्रिया हाती घेण्यात आली असून जिल्हास्तरावरील ४० लाखांचे बक्षीस कोणत्या गावास मिळते हे बघण्यासारखे आहे. स्वच्छता, आॅनलाईन, घनकचरा व्यवस्थापनासह अन्य निकषात कोणते गाव बसते याबाबत उत्सूकता आहे.
तालुकास्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून आंधई (चिखली), धामणगाव धाड, सिंदखेड, घिर्णी, काटी, कुंवरदेव, सगोडा, टाकरखेड, मादणी, वडगाव तेजन, सोयंदेव, पिंपळगाव (देऊळगाव राजा) या गावांची निवड झाली होती. स्वच्छता, आॅनलाईन सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, डिजीटल स्कूल, पाणीपुरवठ्यासह अन्य काही निकषांच्या आधारावर या १३ गावातून सरस ठरणाऱ्या एका गावाची जिल्हास्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात येणार आहे. २२ आॅगस्ट पासून या गावांची जिल्हास्तरीय निवड समितीकडून पाहणी करण्यात येणार होती. मा^^त्र मुख्यमंत्र्यांच्या दौºयामुळे ती स्थगित करून या दौºयानंतर स्मार्ट ग्रामसाठी मुल्यांकन होणार आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणावर जागृती झाली असून या १३ स्मार्ट ग्राममध्ये जिल्हास्तरावरील स्मार्ट ग्राम बनण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. गावाच्या शाश्वत विकासासाठी आता ग्रामस्थ झटत असल्याने ही स्पर्धा वाढत आहे.