गांधिगीरी आंदोलन करणा-यांविरोधात तक्रार

By admin | Published: May 24, 2017 07:39 PM2017-05-24T19:39:41+5:302017-05-24T19:39:41+5:30

धाड : देशी दारू दुकानात येणाऱ्यांचा पुष्पमाळा घालून सत्कार केला. या आंदोलनाला वेगळे वळण लागले असून, सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

Complaint against gandhi agitation activists | गांधिगीरी आंदोलन करणा-यांविरोधात तक्रार

गांधिगीरी आंदोलन करणा-यांविरोधात तक्रार

Next

धाड : देशी दारूचे दुकान गावाबाहेर हलविण्याकरिता येथील महिलांनी २२ मे रोजी गांधिगीरी करीत देशी दारू दुकानात येणाऱ्यांचा पुष्पमाळा घालून सत्कार केला. या  आंदोलनाला वेगळे वळण लागले असून, यामध्ये सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार देण्यात आली तर आंदोलनातील महिलांनीही त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे.
करडी गावातील नागरिक पंढील भगवान तायडे यांनी पोलिसात तक्रार दिली, की २२ मे रोजी सायंकाळी मालवे यांच्या मेडिकलसमोरून जात असताना बबन जोशी, अरविंद गुजर व इतर चार जणांनी मारहाण केली. या तक्रारीवरून कलम १४७, ३२३, ६०५, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांकडून नलीनी जोशी व अन्य महिलांनी पोलिसात तक्रार दिली की, २२ मे रोजी दारू पिणा-यांचे पुष्पमाळा घालून स्वागत करताना पंढरी भगवान तायडे याने शिवीगाळ केली. तसेच प्रमोद काशिनाथ गुजर व माधव तायडे यांनीही शिवीगाळ केली. या तक्रारीवरून ३५४, ३४१, २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Complaint against gandhi agitation activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.