एकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 03:07 PM2018-05-24T15:07:20+5:302018-05-24T15:07:20+5:30

लोणार : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून जमा झालेल्या रक्कमेतून १ लाख ९४ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी  अध्यक्ष, सचिव व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिरा  बुद्धू चौधरी यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

Complaint of grabbing the Integrated Watershed Fund | एकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार 

एकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार 

Next
ठळक मुद्देतालुक्यातील तांबोळा येथे मागील पाच  वर्षापासून एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कामे सुरु होती.लोकसहभागातून जमा झालेले दोन लाख रुपये बीबी येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या खात्यामध्ये जमा होते. १८ मे रोजी या खात्याची चौकशी केली असता खात्यामध्ये केवळ ६ हजार रुपये आढळून आले.

लोणार : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून जमा झालेल्या रक्कमेतून १ लाख ९४ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी  अध्यक्ष, सचिव व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिरा  बुद्धू चौधरी यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
तालुक्यातील तांबोळा येथे मागील पाच  वर्षापासून एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कामे सुरु होती. या कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून जमा झालेले दोन लाख रुपये बीबी येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या खात्यामध्ये जमा होते. १८ मे रोजी या खात्याची चौकशी केली असता खात्यामध्ये केवळ ६ हजार रुपये आढळून आले. लोकसहभागातील दोन लाख रक्कमेपैकी १ लाख ९४ हजार रुपये विद्यमान अध्यक्ष, सचिव व  संबधित कृषी अधिकाऱ्यांनी संगनमत करून कुठलीच सभा न घेता नवीन समिती नेमून खाते बदल करून काढून घेतल्याची तक्रार तांबोळा येथील हिरा बुद्धू चौधरी, प्रकाश रामकिसन आटोळे, मधुकर सीताराम राठोड, राहुल आनंदा मोरे व उद्धव माधवराव आटोळे यांनी २२ मे रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकाºयांकडे केली आहे. तसेच  या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागाणी करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

संबधित व्यवहार करताना तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधावा, असे पत्र बँकेला दिलेले आहे. या तक्रारीनुसार चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- मनीषकुमार दांडगे, तालुका कृषी अधिकारी,लोणार.

Web Title: Complaint of grabbing the Integrated Watershed Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.