शेतीविषयक विद्युत कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा : रायमुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:13+5:302021-05-23T04:34:13+5:30
बैठकीमध्ये विविध प्रश्न, समस्या व त्यावर करावयाचे उपाययोजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली. आमदार रायमुलकर पुढे म्हणाले की सध्या कोरोना ...
बैठकीमध्ये विविध प्रश्न, समस्या व त्यावर करावयाचे उपाययोजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली. आमदार रायमुलकर पुढे म्हणाले की सध्या कोरोना परिस्थितीत खासगी व शासकीय कोविड सेंटरचा विद्युतपुरवठा २४ तास सुरू ठेवणे, तसेच ग्राहकांना ऑनलाइन बिल भरण्यास प्रोत्साहित करणे या विषयावर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या वीज वितरण कंपनी संदर्भात वेळोवेळी माझ्याकडे तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देऊ नका. शेतकऱ्यांची कामे वेळेच्या आत पूर्ण करा. शेतातील लाइन वेळोवेळी खंडित राहत असल्याने शेतकऱ्यांना पिके व भाजीपाला पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका, असे ही आमदार रायमुलकर यांनी सांगितले. या बैठकीला पं. स. सभापती दिलीप देशमुख, कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये, जिल्हा विद्युतीकरण समिती सदस्य तथा उपसभापती बबनराव तुपे व मेहकर-लोणार तालुक्यातील वीज कंपनी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.