एक्झॉटिक मागूर माशावर पुर्णत: बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:55 AM2021-02-03T11:55:33+5:302021-02-03T12:00:39+5:30
exotic catfish एक्झॅटिक मागूर क्लॅरिअस गॅरीपिनस मासळीचे साठे जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणाखाली नष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी एक्झॉटिक मागूर (क्लॉरिअस गॅरीपिनस) माशावर पूर्णत: बंदी घातलेली आहे. या आदेशानुसार मासळीचे मत्स्यबीज संचयन करणे, संवर्धन करून वाढविणे, उत्पादन घेणे, विक्री करणे आणि आहारात खाण्यासाठी मासळी वापरण्यास बंदी घातलेली आहे. या मासळीमुळे प्रदूषण होते आणि घातक गंभीर आजार या मासळीचे सेवन, करणाऱ्यास होतात. त्यामुळे एक्झॅटिक मागूर क्लॅरिअस गॅरीपिनस मासळीचे साठे जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणाखाली नष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे.
तसेच मागूर मासळीची विक्री होत असल्यास किंवा मस्त्य साठ्याबद्दल माहिती असल्यास तातडीने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी यांना माहिती द्यावी. तसेच याची नोंद घेऊन सामाजिक आरोग्य जपण्यासाठी हे मिशन यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक)स. इ नायकवडी यांनी केले आहे.