विकास कामे मुदतीत पूर्ण करा
By admin | Published: August 11, 2015 11:56 PM2015-08-11T23:56:18+5:302015-08-11T23:56:18+5:30
शेगाव विकास आराखड्याचा आढावा बैठकीत बांधकाम राज्यमंत्र्यांचे आदेश.
बुलडाणा : शेगाव विकास आराखड्यातील प्रस्तावित असलेली अपूर्ण राहिलेली विकास कामेही जलदगतीने पूर्ण करण्यासोबतच २0१५-१६ या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बुलडाणा व खामगाव विभागांनी नियोजित केलेले असतील. ही सर्व कामे विहीत मुदतीत पूर्ण करावी. प्रत्येक काम नियोजनबद्धरीत्या गुणवत्तापूर्ण करावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी आज केल्या. शेगाव येथील विश्रामगृहामध्ये राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अधीक्षक अभियंता व्ही. बी. भाले, बुलडाणा विभागाचे कार्यकारी अभियंता हत्ते, खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण व अन्य अधिकारी उपस्थित होते. आदेशित केले, याप्रसंगी मिथीलेश चव्हाण यांनी २0१५-१६ मध्ये खामगाव विभागात १0१ कामे प्रस्तावित असल्याचे सांगत १५ कोटी रुपयांची तरतूद व १९ कोटी रुपयांची मागणी असल्याची माहिती दिली. तसेच हत्ते यांनी बुलडाणा विभागात एकूण प्रस्तावित ५६ कामे, यासाठी २२ कोटी रुपयांची तरतूद असल्याचे सांगितले. यावेळी राज्यमंत्री पोटे यांनी बाबनिहाय कामांचा आढावा घेतला. यानंतर ना.पोटे यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून त्यांच्या तसेच उपस्थित नागरिकांचे निवेदने स्वीकारून त्यांचे समाधान केले.