अमडापूर बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:00+5:302021-08-13T04:39:00+5:30
अमडापूर हे मोठे गाव असून, या शहराला अनेक खेडी संलग्न आहेत. अमडापूर येथे मोठी बाजारपेठ असल्याने त्याठिकाणी नेहमी गर्दी ...
अमडापूर हे मोठे गाव असून, या शहराला अनेक खेडी संलग्न आहेत. अमडापूर येथे मोठी बाजारपेठ असल्याने त्याठिकाणी नेहमी गर्दी असते. त्यामुळे आ. श्वेता महाले यांच्या प्रयत्नातून २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अमडापूर येथे १ कोटी १४ लक्ष रुपये किंमतीच्या अत्याधुनिक बसस्थानकासाठी मान्यता मिळविली होती. त्याचवेळी या बस स्थानकाच्या बांधकामाचा कामाचा शुभारंभ ही झाला होता. दरम्यान बसस्थानकाचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले होते. परंतू, सरकार बदलले आणि बसस्थानकाचे काम रखडले. याबाबत आ. महाले यांनी यासाठी तारांकित प्रश्न, लक्षवेधी, कपात सूचना या संसदीय आयुधामार्फत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे रखडलेले अमडापूर बस स्थानकाचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.
या कामांचा समावेश
एकूण ६ फलाट, चालक/वाहक विश्रांतीगृह, महिला विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, स्थानकप्रमुख कक्ष, चौकशी कक्ष उपाहारगृह, प्रवाशांसाठी प्रसाधनगृह, प्रतीक्षागृह, आसन व्यवस्था, आरक्षण कक्ष, बसस्थानकावर स्वतंत्र इन व आऊट गेट इत्यादी कामाचा समावेश असलेल्या हे काम तातडीने मार्गी लागावे, यानुषंगाने आमदार महाले आढावा बैठक घेत संबंधिताना युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.