पुनर्वसित गावातील कामे विहित कालावधीत पूर्ण करा- फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:15 PM2017-09-04T23:15:20+5:302017-09-04T23:15:25+5:30
बुलडाणा: जिगावचे पुनर्वसन नांदुरा शहराजवळ होत आहे. जिगाव प्रकल्पांमधील बुडीत गाव जिगावच्या पुनर्वसित गावठाणातील विकास कामांची पाहणी सोमवारला पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी करून पुनर्वसित गावातील कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क

येथील विकास कामांची पाहणी करताना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्यांना सूचना दिल्या. यावेळी आमदार आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कचरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, नांदुरा तहसीलदार वैशाली देवकर, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, पुनर्वसित गावठाणामधील विकास कामे दर्जेदार पद्धतीने करण्यात यावी. विहित कालावधीत गावठाणातील नागरी सुविधा देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. वेळेवर गावाचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. याप्रसंगी संबंधित यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.