ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 08:21 PM2017-10-09T20:21:56+5:302017-10-09T20:22:05+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली असून, संमिश्र निकाल हाती आले आहे. विजयी झालेल्या सरपंचांवर सर्वच पक्ष आता दावा सांगायला लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली असून, संमिश्र निकाल हाती आले आहे. विजयी झालेल्या सरपंचांवर सर्वच पक्ष आता दावा सांगायला लागले आहेत.
सोमवारी सकाळपासून प्रत्येक तालुक्याताील तहसिल कार्यालयात मतमोजनीला सुरूवात करण्यात आली. यावेळी तहसिलसमोर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जसजसे निकाल घोषित होत होते, कार्यकर्ते गुलाल उधडत आनंद साजरा करीत होते. थेट मतदारांमधून पहिल्यांदाच सरपंचपदाची निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. घाटाखाली भाजप व राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले तर घाटावर काँग्रेस व शिवसेनेला अपेक्षित जागा मिळाल्या. घाटावरील बुलडाणा तालुक्यात काँग्रेस, मोताळा तालुक्यात शिवसेना, देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. घाटाखालील खामगाव व जळगाव जामोद तालुक्यात भाजप, नांदूरा व शेगाव तालुक्यात काँग्रेसला यश मिळाले.
ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही पक्षाच्या चिन्हाविना निवडणूक लढविण्यात आली. मात्र, सरपंच विजयी झाल्यानंतर सर्वच पक्ष तो आपल्याच पक्षाशी संबंधित असल्याचा दावा करीत आहे.