संगणकीकृत सातबा-याने शेतक-यांची डोकेदुखी
By admin | Published: May 11, 2015 11:38 PM2015-05-11T23:38:32+5:302015-05-12T00:08:52+5:30
सिंदखेडराजा तालुक्यात जुन्याच नोंदीचा मिळतो संगणकीकृत सातबारा.
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): संगणीकृत सातबारे अद्ययावत करण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने विविध उपाययोजना निर्माण केल्या जात आहेत. मात्र आजही तालुक्यातील अनेक संगणकीकृत सातबारा जुन्याच नोंदीचा मिळ त आहेत. तसेच काही ठिकाणी संगणकीकृत सातबार्यांसाठी सेतु केंद्रावर शेतकर्यांना जादा पैशाची मागणी केली जात असल्याने संगणकीकृत सातबारे शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
शेतकर्यांना सातबारा सहज उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने सातबारा संगणीकृत केला. त्यामुळे शेतकर्यांना सातबार्यासाठी तलाठय़ाकडे वारंवार खेटे घालण्याची गरज राहिलेली नाही. तसेच त्याला कोणत्याही ठिकाणी आणि दुरच्या गावातही संगणकाद्वारे सातबारा उपलब्ध झाला. यामुळे शेतकर्यांचा वेळ व पैसा वाचला आहे. मात्र गत तीन वर्षात महसुल विभागाने संगणकीकृत सातबारे अद्ययावत केले नाहीत.
या काळात शेतीच्या खरेदी विक्रीचे अनेक व्यवहार झाले. कौटुंबिक वाटेहिस्सेही झाले. त्यामुळे शेतजमीनीची मालकी बदलली या व्यवहाराची नोंद तलाठय़ाच्या दप्तरात झाली. तलाठी नव्या नोंदीचे सातबारा नव्या शेतमालकांना दे तात. त्याआधारे त्यांचे कामेही होतात. मात्र संगणकीकृत सातबार्यांमध्ये बहुतांश ठिकाणी या नव्या नोंदी अद्ययावत करण्यात आल्या नाही. त्यामुळे संगणकीकृत सातबारे जुन्याच शेतमालकाच्या नावाने मिळत असल्याने शे तकर्यांमध्ये गोंधळ उडत आहे. यासंदर्भात तहसीलदार संतोष काणसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील सात मंडळामधील सातबार संगणीकृत करण्याचे काम सुरू असून, एक महिन्याचा आत काम पुर्ण होणार असल्याचे सांगीतले.