कॉम्रेड अल्टा मॅरेथॉन शारीरिक व मानसिक कसोटी- नितीन चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 05:54 PM2019-06-22T17:54:14+5:302019-06-22T17:54:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जागतिकस्तरावर मानाची आणि अत्यंत कठीण अशा दक्षिण आफ्रिकेतील अल्टा कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत व्यवसायाने कंत्राटदार असलेले नितीन चौधरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जागतिकस्तरावर मानाची आणि अत्यंत कठीण अशा दक्षिण आफ्रिकेतील अल्टा कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत व्यवसायाने कंत्राटदार असलेले नितीन चौधरी
यांनी ९ जून रोजी ११ तास ५८ मिनीटात ८७ किमीचे अंतर पूर्ण करून बुलडाण्याचा झेंडा फटकवला. जगातून २१ हजार स्पर्धेक यात सहभागी झाले
होते. त्यात टिकून बुलडाण्याचा लौकिक वाढविणाºया नितीन चौधरींशी साधलेला हा संवाद...
आता पुढील उदिष्ट काय?
यंदा ८७ किमीची अप रनची ही स्पर्धा पूर्ण केली. पुढील टप्प्यात याच स्पर्धेत ९० किमीच्या डाऊन रन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन ती पूर्ण करण्याचे
उदिष्ट आहे.
आपण स्पर्धा पूर्ण करू या बाबात आश्वस्त होता का?
नामांकित आणि अत्यंत टफ अशी ही स्पर्धा आहे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची येथे कसोटी लागते. सहा वर्षापासून धावण्याचा सराव होता.
२०१६ पासून खºया अर्थाने प्रशिक्षण सुरू केले. स्पर्धा पूर्ण करण्याबाबत आश्वस्त होतो. परंतू स्पर्धेदरम्यान, काठिण्य पातळी पाहता मनात
नकारात्मक विचार येतात. सहा महिन्यापासून पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी केली होती.
तापमान किती फायदेशीर ठरले?
डरबन ते पीटरमिरसबर्ग दरम्यान पाच कटआॅफ मध्ये ही स्पर्धा घेण्यात येते. तेथे पायथ्याला १४ ते १६ आणि शिखरावर ४ ते ५ अंश सेल्शियस तापमान असते. इकडे आपण ३५ ते ४० अंश सेल्शियसमध्ये सराव करतो. त्यामुळे ते वातावरण एक उत्साह वाढविणारे ठरते. त्याचा नक्किच फायदा झाला. परंतू पाच कटआॅफमध्ये निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण न केल्यास मेडल आणि सर्टीफिकेटही मिळत नाही.
स्पर्धेची माहिती कशी मिळाली?
औरंगाबाद येथे आमचा रणर ग्रुप आहे. त्यांच्याकडून या स्पर्धेची माहिती मिळाली. सोबतच योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे येथे पर्यंत पोहोचता आले.
स्पर्धेसाठी पात्रतेचा निकष काय?
या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी प्रथत: ४२ किमीची मॅरेथॉन चार तास ५० मिनीटामध्ये पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. यंदाची ९५ मॅरेथॉन ही दोन
आफ्रिकन खेळाडूंनी जिंकली आहे. त्यांनी ५ तास २९ मिनीट आणि पाच तास ३० मिनीटात हे अंतर पार गेले तर तिसºया स्थानी जपानी खेळाडू होता.
महिलांमध्ये आॅॅस्ट्रेलियाच्या महिलेने ही स्पर्धा जिंकली असून जवळपास त्यासाठी तीने सहा तासांचा अवधी घेतला. आफ्रिकेतील कॉम्रेड अल्टा या
सोल्जरला ही स्पर्धा समर्पित आहे.
ेसमुद्र सपाटीपासून दोन हजार मिटर उंचीवर ही स्पर्धा घेण्यात येते. मानसिकस्तरावर कणखर बनण्यास या स्पर्धेतून मदत मिळते. आपले मुळ असलेल्या बुलडाणा शहरातील अॅथलिट्सनाही प्रोत्साहित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. स्पर्धा फारच टफ आहे. १६ ते ४ अंश सेल्सियस दरम्यान तापमान तेथे असते. स्पर्धेदरम्यान अनेक नकारात्मक विचार येतात. त्यावर मात केलेलाच स्पर्धेत टिकतो.
- नितीन चौधरी