अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:03 AM2021-03-13T05:03:01+5:302021-03-13T05:03:01+5:30
अमडापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांर्गत परिसरातील २८ गावांमधील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविली जाते. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ...
अमडापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांर्गत परिसरातील २८ गावांमधील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविली जाते. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाकडून सध्या कोविड लसीकरण आठवड्यातून तीन दिवस सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, अमडापूर येथे ४५ वर्षांवरील रुग्ण व ६० वय वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. कोविड ॲपमध्ये नोंदणी करून व ओळख पटवून लस देण्यात येणार आहे. पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील सर्वांचे आरटीपीसीआर नमुने तपासणी करून घ्यावी आणि सुपर स्प्रेडर यांनीसुध्दा तपासणी करून घ्यावी. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, नियमांचे काटेकोरपणे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व आदेशांचे पालन करून अंमलबजावणी करावी, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक लोखंडे यांनी दिली आहे.