बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय काेराेना रुग्णांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 11:48 AM2021-08-10T11:48:19+5:302021-08-10T11:48:27+5:30

Corona Cases : दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच सक्रिय रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे़.

Concerns raised by active corona patients in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय काेराेना रुग्णांनी वाढविली चिंता

बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय काेराेना रुग्णांनी वाढविली चिंता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच सक्रिय रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे़.  जिल्ह्यात काेराेना चाचण्याची संख्या घटल्याने रुग्णांची संख्या कमी येत आहेत़.  त्यामुळे, चाचण्या वाढविण्याची गरज आहे़. 
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़  अनेकांचा मृत्यू झाला़.  एप्रिल ते मे महिन्यांत तर अनेकांना ऑक्सिजन बेडसाठी भटकंती करावी लागली़.  गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे़.  रुग्ण कमी झाल्याने आराेग्य विभागाने काेराेना चाचण्याही कमी केल्या आहेत़.  त्यामुळे पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात अनेक रुग्ण खासगी रुग्णांलयामध्ये उपचार घेत आहेत़.   गत काही दिवसांपासून काेराेनावर मात करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे़.  राज्यातील अनेक जिल्हे काेराेनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना बुलडाणा जिल्ह्यात ६० रुग्ण उपचार घेत आहेत़.  त्यामुळे, प्रशासनाची चिंता वाढली आहे़  आराेग्य विभागाने आणखी उपाय याेजना करण्याची गरज आहे़. 

चिखली तालुक्यात सर्वाधिक रुग्ण  
  गत काही दिवसांत जिल्ह्यातील इतर तालुक्यांची काेराेनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना चिखलीत मात्र रुग्ण वाढतच आहे़  अनेक तालुक्यात एकही रुग्ण आढळत नसताना चिखलीत मात्र, दरराेज रुग्ण आढळत आहेत़   सक्रिय रुग्णही चिखली तालुक्यातच असल्याने तातडीने उपाय याेजना करण्याची गरज आहे़.

 

जिल्ह्यात आणखी सहा पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात साेमवारी आणखी सहा जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ९२८ अहवाल निगेटिव्ह आले असून, ७ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  
 

Web Title: Concerns raised by active corona patients in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.