उंद्री येथील उपोषणाची लेखी आश्वासनाने सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:36 AM2021-03-27T04:36:00+5:302021-03-27T04:36:00+5:30
उंद्री येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे व्यापारी गाळे असून अनेक वर्षापासून ज्या व्यापाऱ्यांना दिले होते त्यांच्याच ताब्यात असून त्यांची करारनाम्याची तारीख ...
उंद्री येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे व्यापारी गाळे असून अनेक वर्षापासून ज्या व्यापाऱ्यांना दिले होते त्यांच्याच ताब्यात असून त्यांची करारनाम्याची तारीख संपली असतानासुद्धा खाली करून घेण्यात आले नाही. त्यांनी परस्पर दुसऱ्या व्यापाऱ्यांना गाळे भाड्याने दिले आहेत व स्वतः भाडे घेत आहेत. ग्रामपंचायतला भाडे भरत नाही, यामधील व्यापारी गाळे दिव्यांग बांधवांनासुद्धा दिलेली नाही. हे गाळे खाली करून दिव्यांग बांधवांना व बेरोजगार युवकांना दुबार हराशी करून देण्यात यावे, याकरिता उंद्री ग्राम विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांना १७ मार्चला याबाबत निवेदन देण्यात आले होते. परंतु याबाबत कोणतीही दखल घेऊन कारवाई करण्यात आली नाही. २९ जानेवारी २०२१ रोजी मासिक सभेमध्येसुद्धा व्यापारी गाळे करारनाम्याचे उल्लंघन झाले असल्याने खाली करून घेण्यात यावे, असा ठराव पारित करण्यात आला होता. तरीही याबाबत कोणतीही कारवाई ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी गिऱ्हे यांच्याकडून करण्यात आली नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच केंद्र शासनाने पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूच्या महागाईमुळे नागरिकांचे जीवन जगणे कठीण केले आहे. केंद्र शासनाच्या धोरणा विरोधात उंद्री ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस (अल्पसंख्याक विभाग) चिखली तालुका वतीने करण्यात आले. या उपोषणाची सांगता गट विकास अधिकारी पं.स. चिखली जाधव यांच्या हस्ते लेखी आश्वासन देऊन करण्यात आली.
यावेळी उपोषणकर्ते रफिक शेख व राजीक खान यांना गट विकास अधिकारी यांच्या हस्ते तसेच रा.कॉ.पा. तालुका अध्यक्ष गजानन वायाळ यांच्याहस्ते सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले. या वेळी गट विकास अधिकारी जाधव, विस्तार अधिकारी पानझाडे, रा.कॉ.तालुका अध्यक्ष गजानन वायाळ, उंद्री ग्राम विकास अधिकारी गिरहे, सरपंच भाई प्रदीप अंभोरे, कृष्णा मिसाळ, घनश्याम मदगे, मंगेश ढोके, अनिस खा, अयाज, शेख बिस्मिल्ला, विनायक नसवाले, तफझुल खान उपस्थित होते.