पेनटाकळी प्रकल्पात सुरू असलेल्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:54+5:302021-02-09T04:37:54+5:30

आ.डॉ. संजय रायमूलकर यांच्या मध्यस्तीने गेल्या तीन दिवसांपासून पेनटाकळी धरणात पाण्यात सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण सोमवारी सुटले. आ.डॉ. संजय ...

Concluding the ongoing hunger strike at the Pentacle project | पेनटाकळी प्रकल्पात सुरू असलेल्या उपोषणाची सांगता

पेनटाकळी प्रकल्पात सुरू असलेल्या उपोषणाची सांगता

Next

आ.डॉ. संजय रायमूलकर यांच्या मध्यस्तीने गेल्या तीन दिवसांपासून पेनटाकळी धरणात पाण्यात सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण सोमवारी सुटले. आ.डॉ. संजय रायमूलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी उपोषण करणाऱ्यांना शेतकऱ्यांना सरबत पाजून उपोषण सोडविले. पेनटाकळी धरणाचा मुख्य कालवा ० ते ११ किलोमीटरमध्ये पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांचे कालव्याच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम न झाल्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून परिसरातील शेतीचे व पिकांचे नुकसान होत होते. कालव्यामुळे दुधा, ब्रम्हपुरी, रायपूर या परिसरातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील खरीप पिकांचे व रब्बी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत होते. सोमवारी जयंत पाटील यांच्याशी आ. रायमुलकर यांनी चर्चा करून या शेतकऱ्यांच्या मागणीची मंजुरी घेऊन हे उपोषण सोडविले.

Web Title: Concluding the ongoing hunger strike at the Pentacle project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.