शारंगधर बालाजी उत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:33+5:302021-01-08T05:52:33+5:30
शारंगधर बालाजी उत्सव कार्यकाळात संस्थानतर्फे कुठलेही धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले नव्हते. अतिशय साध्या पद्धतीने हा उत्सव पार ...
शारंगधर बालाजी उत्सव कार्यकाळात संस्थानतर्फे कुठलेही धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले नव्हते. अतिशय साध्या पद्धतीने हा उत्सव पार पडला. पाच ते सहा फुटाच्या अंतराचे पालन करून भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. उत्सवा दरम्यान २२ डिसेंबर रोजी १३२ भक्तांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला. २६ डिसेंबर २०२० रोजी नांदुरा येथील मोहनराव नारायण नेत्रालय यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी गरजू ३५१ लोकांची नेत्र तपासणी केली. या उत्सवा दरम्यान शारंगधर बालाजी भगवान यांच्या नयन मनोहर पोशाखामध्ये श्रींच्या दर्शनाचा लाभ भाविकांना झाला. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी संस्थानचे सचिव दीपक पांडे, विश्वस्त उमेश मुंदडा, वकील हेमंत देशमुख, वकील संजय सदावर्ते, डॉ. नंदकुमार उमाळकर, गोपाल अग्रवाल, संस्थानचे व्यवस्थापक हनुमंत देशमुख, विनायक बदामे, पंकज बोरकर, गोपाळराव जाधव, शारंगधर सेवा मंडळाचे सेवेकरी नीलेश दायमा, विनोद राऊत, सतीश सावळे, आशिष दायमा, राहुल पुरोहित, संस्थानचे पुजारी दिलीप देशपांडे, गोविंद पिंपरकर, दीपक जोशी यांनी परिश्रम घेतले.