झेप साहित्य संमेलनाचा समाराेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:27 AM2020-12-26T04:27:20+5:302020-12-26T04:27:20+5:30
हिवरा आश्रम : अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनामुळे साहित्य चळवळीला बळ मिळते. व्यक्तीची गुणवत्ता व तिचे समाजाप्रति सेवा - ...
हिवरा आश्रम : अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनामुळे साहित्य चळवळीला बळ मिळते. व्यक्तीची गुणवत्ता व तिचे समाजाप्रति सेवा - समर्पण-त्याग पाहायचे की जाती-धर्माच्या- शास्राच्या सनातन काट्यावर व्यक्तिला तोलायचे- मापायचे हे आपण सर्वांना करायचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. विनायक तुमराम यांनी केले.
हिवरा आश्रम येथे विवेकानंद साहित्य नगरीत दहाव्या अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ते संमेलनाध्यक्ष पदावरून बोलत होते. दाेन दिवशीय संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेेते. संमेलनात वकील विजयकुमार कस्तुरे, सज्जन टाकसाळे, संजय मोहिते, बबन महामुने, छाया बैसाणे- सोनवणे, दीपक सोनवणे, किरण डोंगरदिवे, राजेंद्र सपकाळ, टी. एस. चव्हाण आणि त्र्यंबक बरकले यांना मातोश्री हरणाबाई जाधव राज्य पातळीवरील पुरस्कार प्राचार्य डॉ. एम. डी. कड पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विचारपीठावर संमेलन उद्घाटक ॲड. अनंतराव वानखेडे, सत्यजित अर्बन परिवाराचे संस्थापक श्याम उमाळकर, जि. प. सदस्य संजय वडतकर, झेप साहित्य चळवळीचे संस्थापक डी. एन. जाधव, झेप पुरस्कार निवड समिती अध्यक्ष, लेखिका ए. बी. साळवे, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, मनोहर पाटील, स्वागताध्यक्ष शिवाजी घोंगडे, संमेलन निमंत्रक प्राचार्य पंढरीनाथ शेळके, अशोक खेडेकर, विठ्ठल भाकडे ,अशोक लहाने, मधुकर शेळके,दामोधर गारोळे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी आठ वाजता हिवरा आश्रमात तथागत गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, स्वामी शुकदास महाराज यांच्या मूर्तीस संमेलनाध्यक्ष डॉ. विनायक तुमराम यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर संविधान ग्रंथ दिंडीची सुरुवात माजी सरपंच निर्मला डाखोरे, पोलीस पाटील रविप्रकाश घोंगडे व पोलीस पाटील विवेक लहाने यांच्या हस्ते करण्यात आली. संमेलनासाठी संयोजन समिती अध्यक्ष मधुकर वानखेडे, सचिव वसंतराव हिवाळे, नितीन इंगळे, विश्वजित गवई, संजय भारती, आर.डी.पवार, शाहीर ईश्वर मगर, पुरुषोत्तम अकोटकर, बबनराव महामुने, शत्रुघ्न कुसुंबे आदींनी परिश्रम घेतले.