ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल
By admin | Published: September 13, 2014 12:09 AM2014-09-13T00:09:58+5:302014-09-13T00:09:58+5:30
मेहकर येथील वैद्यकीय अधिकार्यांचे दुर्लक्ष.
मेहकर : स्थानिक ग्रामीण रुग्णालयाकडे वैद्यकीय अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे रुग्णालयात विविध समस्या जन्म घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले असून, गोरगरिब रुग्ण ग्रामीण रुग्णालयात धाव घेत आहेत. परंतु या रुग्णालयात त्यांना असुविधा मिळत असल्याने प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.बी.पंडीत यांच्याकडे शेगाव व मेहकर या दोन तालुक्याचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांचे मेहकर येथील रुग्णालयाकडे दुर्लक्षच असते. वैद्यकीय अधिकार्यांचे मेहकर येथे सोमवार, गुरुवार व शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस ठरलेले आहेत. मात्र या ितनही दिवशी वैद्यकीय अधिकार्यांचे येथील रुग्णालयाला दर्शन दुर्लभच असते. गुरुवारला तर सुमारे ३00 रुग्ण येथे उपचारासाठी आले होते. परंतु रुग्ण तपासणी उशिरा सुरु झाल्याने रुग्णांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे काही रुग्ण उपचारा अभावी परतही गेले. तसेच रुग्णालयात ३६ रुग्ण उपचारासाठी दाखल होते. रुग्णालयात काही डॉक्टर व कर्मचारी हजर राहत नसल्याचेही या दाखल रुग्णांनी सांगितले. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.