बुलडाण्यात शनिवारी रंगणार ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेची दशा व दिशा’वर परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 05:39 PM2017-12-22T17:39:51+5:302017-12-22T17:45:35+5:30
बुलडाणा : आजच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या विविध समस्यांवर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित मान्यवरांच्या समवेत बुलडाणा येथे २३ डिसेंबरला शैक्षणिक परिसंवाद होणार आहे.
बुलडाणा : आजच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या विविध समस्यांवर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित मान्यवरांच्या समवेत बुलडाणा येथे २३ डिसेंबरला शैक्षणिक परिसंवाद होणार आहे. ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेची दशा व दिशा’ या विषयावर हा परिसंवाद रंगणार आहे. शैक्षणिक परिसंवाद बुलडाणा येथे २३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता गर्दे वाचनालय येथे होणार असून, या परिसंवादाचा विषय ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेची दशा व दिशा’ हा आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, प्रमुख वक्ते प्रा.प्रविण देशमुख हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून आ.राहुल बोंद्रे, आ.हर्षवर्धन सपकाळ, महेश कजगावकर, डॉ.श्रीराम पानझाडे, विजयराज शिंदे, राधेश्याम चांडक, धृपदराव सावळे, योगेंद्र गोडे, समाधान सावळे, सुनिल देशमुख, विश्वनाथ माळी, अॅड.कविमंडन, विश्वंभर वाघमारे, मधुकर पाटील, रविंद्र वानखडे, डॉ.विकास बाहेकर, शिवराज कायंदे उपस्थित राहणार आहेत. यामध्ये १ व २ जुलै रोजी घोषीत झालेल्या व उरलेल्या अघोषित शाळांना अनुदान देणे, १ नोव्हेंबर २००५ पुर्वी व नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, २००५ पुर्वी अंशत: अनुदानित तत्वावर रुजू झालेल्या व उच्च न्यायालयातून स्थगिती मिळालेल्या सर्व कर्मचाºयांचे भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करणे, सेवेत असताना जे कर्मचारी मृत पावलेले आहेत त्यांच्या पाल्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणे, १६२८ शाळांना प्रचलीत नियमानुसार वेतन अनुदान देणे, २००५ नंतर टप्पा अनुदानावर आलेल्या शिक्षकांचा प्रश्न, वरिष्ठ व निवड श्रेणी बाबतचा २३ आॅक्टोबर २०१७ रोजीचा शासननिर्णय रद्द करणे, प्लान वेतनामधील शिक्षकांचे नॉन प्लान वेतनामध्ये रुपांतर करणे असे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या सर्व प्रश्नावर चर्चा व्हावी व त्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविल्या जाव्यात यासाठी बुलडाणा येथे शैक्षणिक परिसंवाद घेण्यात येणार आहे. या परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)