शहीदाच्या कुटुंबियांचे सांत्वनही दुरुनच; अश्रुवाटे भावनांना वाट मोकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 04:45 PM2020-04-19T16:45:14+5:302020-04-19T16:45:49+5:30
कोराची साथ असून खबरदारी म्हणून घेतलेली काळजी भावनांना थांबवू शकली नाही.
- श्याम देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पातुर्डा : शहीद चंद्रकांत याची आई निर्मला, पत्नी मनिषा, दिव्या आणि कुश ही मुले पुण्याहून सीआरपीएफच्या विशेष वाहनातून पातुर्ड्यात पोहचले. वीरमाता व वीर पत्नीचे सात्वनही महिलांनी दुरुनच केले. सद्या कोराची साथ असून खबरदारी म्हणून घेतलेली काळजी भावनांना थांबवू शकली नाही. दाटलेला कंठ हुंदके अन् ओथंबून आलेल्या भावनांना अश्रुंनी वाट मोकळी करुन दिली.
गावातील बहुतेक महिलांनी भाकरे यांच्या घरी भेट दिली. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर दुरुनच सांत्वन केले. वीरमाता व वीर पत्नीची विचारपूस केली. यावेळी महिलांना गहिवरुन आहे. गळ्यात गळा टाकून आधार देत सांत्वन टाळण्यात आली.
वीर मातेने दिला वीर पत्नीला दिलासा !
गावात घरी पोहताच वीरपत्नी मनिषाला रडू कोसळले. पाच महिन्यापूर्वीची भेट अखेरची ठरली. अशा आठवणी सांगतानाच ती धाय मोकलून रडू लागली. त्यावेळी वीरमाता निर्मला यांनी तो माझ्या पोटचा गोळा आहे. त्याला सैन्यात भरती केले. तेव्हाच मी मन घट्ट केले. तू लग्न केले तेव्हाच तू घट्ट बनली रडू नको. धीराने सामना कर तू वीरपत्नी आहेस. असा हृदयस्पर्शी संवाद ऐकूण सात्वन करणाºया महिलाही गहिवरुन गेल्या. आनंद असो वा दु:ख ते व्यक्त होतेच दु:खात सांत्वनाची खरी गरज असते. आधार वाटतो पण निर्दयी मृत्यू व पुढे कोरोनाचे संकट यामुळे खबरदारी घ्यावी दाटलेला कंठ ओशाळलेल्या भावना या सांत्वना अपुरी ठेवू शकल्या नाहीत. अश्रुंनी वाट मोकळी करुन दिली.