ऑनलाइन सामान्य ज्ञान परीक्षाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:42+5:302021-04-05T04:30:42+5:30
येथील सामाजिक कार्यकर्ते रणधीर खरात यांनी वाचाल तर वाचाल ह्या ग्रुपची सुरुवात केली असून ते रोज काही प्रश्न व्हॉट्स ...
येथील सामाजिक कार्यकर्ते रणधीर खरात यांनी वाचाल तर वाचाल ह्या ग्रुपची सुरुवात केली असून ते रोज काही प्रश्न व्हॉट्स ॲपच्या ग्रुपवर देतात. त्यांच्या ह्या उप्रकमाला सर्वच क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही नाचून साजरी न करता वाचून साजरी करावी, ह्या उद्देशाने वाचाल तर वाचाल ग्रुपतर्फे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित प्रश्नावली ही ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले आहे. परीक्षार्थी ऑनलाइन संकेतस्थळावर जाऊन ३ एप्रिल ते १३ एप्रिल ह्या कालावधीमध्ये केव्हाही परीक्षा देऊ शकता.
परीक्षेकरिता वाढता प्रतिसाद पाहता बक्षिसांमध्येसुद्धा बदल करण्यात आला असून पहिले बक्षीस २०००, दुसरे १००० रुपये, तिसरे भारतीय संविधान ह्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आले आहे. ह्या परीक्षेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन असे वाचाल तर वाचाल या ग्रुपचे रणधीर खरात यांनी केले आहे.