खत विक्रीच्या दरावरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:51+5:302021-05-21T04:36:51+5:30
देऊळगाव राजात जुन्या दरानुसार खत विक्री देऊळगाव राजा : शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाकडून प्राप्त मूल्य म्हणजे आधारभूत ...
देऊळगाव राजात जुन्या दरानुसार खत विक्री
देऊळगाव राजा : शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाकडून प्राप्त मूल्य म्हणजे आधारभूत किमती परिपत्रकनुसारच खताची विक्री करणार असल्याचे येथील कृषी केंद्र चालकांनी सांगितले.
बळिराजा विविध खतांची मात्रा पिकानुसार त्यांना देत असतात. केंद्र सरकारने जुन्याच दराने खताची विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. २० मे रोजी शहरातील विविध कृषी केंद्रांना भेट दिली असता जालना रोडवरील डीएपी प्रतिबॅग ११२५ रुपये ते ११२५ रुपये दिसून आले. सध्यातरी जुन्याच भावाने खताची विक्री चालू असल्याची माहिती संतोष वाघ यांनी दिली.
जुन्या खतांनाच जुना दर
सिंदखेडराजा : येथील अनेक कृषी केंद्रात सध्या जुन्याच किमतीची खते उपलब्ध आहेत. त्यामुळे जुन्या खतांना सध्या जुन्याच दरात विक्री केली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे नवीन खतांना जुना दर मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
नवीन खतांचा साठा अद्याप पाहिजे तशा प्रमाणात उपलब्ध झाला नसल्याने शेतकऱ्यांना जुन्याच मालाची खरेदी करावी लागत आहे. कृषी विक्रेत्यांनादेखील आधीचा माल साठा ठेवून चालणार नाही. त्यामुळे जुन्या किमतीतील सर्व प्रकारची खते खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात येत आहे. जिल्ह्यातील दहा दिवसांचा लॉकडाऊन संपला असल्याने राज्यसरकारचे निर्बंध लागू झाले आहेत. त्यात कृषी केंद्र दिवसभर उघडी राहणार असल्याने शेतकरी बी बियाणे, खतांची खरेदी करण्यात व्यस्त झाले आहेत.