खामगाव नगर पालिकेच्या आरक्षीत जागेचा घोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 11:37 AM2021-06-22T11:37:24+5:302021-06-22T11:37:44+5:30

Khamgoan News : खामगाव शहरातील आरक्षीत जागेवर भूखंड पाडून विक्री होत असल्याचा प्रकार उजेडात आला.

Confusion of reserved space of Khamgaon Municipality! | खामगाव नगर पालिकेच्या आरक्षीत जागेचा घोळ!

खामगाव नगर पालिकेच्या आरक्षीत जागेचा घोळ!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  शहर आणि परिसातील खुले भुखंड सुरक्षीत नसतानाच, नगर पालिका हद्दीतील आरक्षीत जागेवरही भूमाफियांचा डोळा असल्याचे दिसून येते. खामगाव शहरातील आरक्षीत जागेवर भूखंड पाडून विक्री होत असल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दुय्यम निबंधकांना पत्र देत भुखंडाच्या खरेदी-विक्रीची नोंद न घेण्यासाठी पत्र दिले आहे. त्यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव शहरात एक दोन नव्हे तर तब्बल १०० पेक्षा अधिक भूखंड बनावट दस्तवेजाद्वारे हडपण्यात आले. महसूल विभागातील तलाठी आणि काही दलालांनी संगनमत करून, शासकीय दस्तवेजात खाडाखोड करीत कोट्यवधी रूपयांचा घोळाचा प्रकार ताजा असतानाच, आता खामगाव नगर पालिका हद्दीतील आरक्षीत जागांवर देखील भूखंड माफीयांचा डोळा असून, हे भूखंड बळकाविण्याच्या दृष्टीकोनांतून काहींचे प्रयत्न सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. 
नगर पालिका हद्दीतील शेत सर्वे नं. २५ आणि २०० मध्ये ७९ भूखंड पाडून खरेदी-विक्री प्रकरणी पालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भूखंडांच्या खरेदी-विक्रीची नोंद न घेण्यासाठी शिवाजी नगर पोलिसांनी १२ मे २०२१ रोजी दुय्यम निबंधक खामगाव यांना पत्र दिले आहे. 
तर शेत सर्वे नं. ३५ मधील प्लॉट-८ वर ले-ऑऊट विकसीत करण्यात आल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. 
नगर पालिकेच्या आरक्षीत जागेवरील भूखंड खरेदी-विक्रीच्या घोळ प्रकरणी तक्रारीवरून गुन्हे दाखल होताच भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. 
खासगी मालकीचे भूखंड सोडाच पालिकेच्या आरक्षीत जागा असुरक्षीत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती या निमित्ताने समोर येत असल्याचे चित्र आहे.


आरक्षीत जागेवर पाडले ७९ भूखंड!
 सुधारित विकास योजना खामगावतंर्गत खामगाव येथील शेत सर्वे नं २५ आणि २०० मध्ये आरक्षण क्रमांक ७३ (हाऊसिंग फॉर अर्बन पुअर) म्हणून आरक्षण नोंदविण्यात आले आहे. 
n मात्र, आरक्षीत जमिनीवर ७९ भूखंड पाडले आणि ५ लाख रूपये प्रमाणे एका प्लॉटची १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

पालिकेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा!
 मुळ मालक प्रविणकुमार जयस्वाल आणि रितेश सुरजलाल जयस्वाल यांच्याकडून आरक्षीत जागेवरील प्लॉटची स्टॅम्पपेपरवर  विक्रीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगर पालिका प्रशासनाच्यावतीने उपरोक्त बाबीची पडताळणी करण्यात आली. 
  त्यानंतर नगर रचना सहा. पंकज राजेंद्र काकड यांच्या माध्यमातून शिवाजी नगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. या तक्रारीच्या महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियम १९६६ चे कलम ५२ अन्वये  संबंधितांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील नगर पालिका हद्दीतील आरक्षीत शेत सर्वे नबंर २५ आणि २०० च्या खरेदी विक्री संदर्भात नोंद न करण्यासाठी शिवाजी नगर पोलिसांचे पत्र प्राप्त झाले आहे. दुय्यक निबंधक कार्यालयाकडून उपरोक्त शेत सर्व्हेमधील भूखंड खरेदी-विक्रीची नोंद करण्यात आलेली नाही.
-ए.बी.पवार
दुय्यम निबंधक, खामगाव.
 

Web Title: Confusion of reserved space of Khamgaon Municipality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.