क्रीडा क्षेत्रातील विजय झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:23+5:302021-04-06T04:33:23+5:30
मेहकर : क्रीडा भारती संघटनेच्या वतीने न्यू रायझिंग स्टार अकादमीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल जिजाऊ पुरस्काराने सन्मानित ...
मेहकर : क्रीडा भारती संघटनेच्या वतीने न्यू रायझिंग स्टार अकादमीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये किक बॉक्सिंग, मार्शल आर्टच्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. विजय बाजाड होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र उमाळे, राठोड, क्रीडा मार्गदर्शक डॉ. मोहन राजदेरकर, शैलेशजी बावने, रफिक कुरेशी, संतोष सारडा, नितीन मोरे, प्रवीण इंगले, प्रशांत जायवाल, नीलेश सोमन, नगरसेवक मनोज जाधव, संजय ठाकूर, माजी सैनिक दत्ता गायकवाड, डॉ. प्रवीण जोशी, रजत मेहकरकर, डॉ. शेळके, नीलेश बावने, अनिल खंडेलवाल, अमित अवस्थी, जोशी, शरद वानखेडे, संजय बोरकर, महाजन आणि न्यू रायझिंग स्टार अकादमीचे निरज गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी जिजाऊ पुरस्कार वेदिका किशोर साकला, दिया तुर्कमाने, श्रुती सारडा, अनुज जाधव, युवराज खरात, ओम ठाकुर, वेदिका पवार, अक्षरा माने, ईश्वर मालावत, लावण्या अग्रवाल, खुशी शेळके, वैष्णवी पैठने, तृतीय पल्लवी तुर्कमाने, चतुर्थ श्रुती बाजड ,पाचवा पीयूष, कनक चरखा, अक्षरा काबरा, प्रीती जाधव, सायली खवने, गौरी सदावर्ते, ईश्वरी अंजनकर,राजेश्वरी मालावत यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात तसेच अजिंक्य वायाळ, आकाश देशमुख, प्रताप चव्हाण, ओम नरवाडे, जिनेन्द्र विलास, मीनल राणा, पल्लवी पोधाडे, नेहा निम्बाले आणि प्रिया ब्राह्मने, कोमल पवार, वैष्णवी महालनकर यांना गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा भारती व न्यू रायझिंग स्टार अकादमी च्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
फ़ोटो