काँग्रेसने केले ‘पर्दाफाश’ आंदोलन!

By Admin | Published: August 26, 2015 12:37 AM2015-08-26T00:37:58+5:302015-08-26T01:07:37+5:30

बुलडाणा काळय़ा फिती लावून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा केला निषेध.

Congress busted 'expose' movement! | काँग्रेसने केले ‘पर्दाफाश’ आंदोलन!

काँग्रेसने केले ‘पर्दाफाश’ आंदोलन!

googlenewsNext

बुलडाणा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी येथील जयस्तंभ चौकात बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने २५ ऑगस्ट रोजी ह्यपर्दाफाश आंदोलनह्ण केले. यावेळी पुदाधिकारी व कार्यकर्त्यांंनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. माजी मंत्री अँड.शिवाजीराव मोघे, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांची समयोचित भाषणे झाली. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य शासनास निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्‍वासनांचा विसर पडला आहे. भाजप सरकारातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार एका वर्षात समोर आला. तरीही या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर मोदी सरकार बोलण्यास तयार नाही. पंतप्रधान पावसाळी अधिवेशनात संसदेमध्ये फिरकलेदेखील नाही. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा, ललित मोदी फरार प्रकरण, डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणात तपास यंत्रणेचे अपयश, चिक्की घोटाळा, शेतकर्‍यांना कर्जमाफी या गंभीर प्रश्नांवर केंद्र व राज्य शासन बोलण्यास तयार नसून, निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांचा विसर पडला आहे. या प्रवृत्तीचा काळय़ा फिती लावून कॉँग्रेस कार्यकर्त्यांंनी तीव्र निषेध केला. यावेळी माजी आमदार बाबूराव पाटील, दिलीपकुमार सानंदा, जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई खंडारे, सभापती अंकुश वाघ, गणेश बस्सी, श्याम उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, बाळाभाऊ भोंडे, नरेंद्र खेडेकर, डॉ. अरविंद कोलते, रामविजय बुरुंगले, मुख्त्यारसिंह राजपूत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress busted 'expose' movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.