मराठा आंदोलकांवर हल्ल्याच्या निषेधार्थ खामगावात काँग्रेसचा मोर्चा, उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने

By अनिल गवई | Published: September 4, 2023 02:04 PM2023-09-04T14:04:42+5:302023-09-04T14:04:59+5:30

या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Congress march in Khamgaon to protest attack on Maratha protesters, protests in front of Sub-Divisional Office | मराठा आंदोलकांवर हल्ल्याच्या निषेधार्थ खामगावात काँग्रेसचा मोर्चा, उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने

मराठा आंदोलकांवर हल्ल्याच्या निषेधार्थ खामगावात काँग्रेसचा मोर्चा, उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने

googlenewsNext

खामगाव: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आंदोलन चिरडण्यासाठी पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलीसांच्या या कारवाईत तीनशेपेक्षा अधिक जण जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

निषेध मोर्चाद्वारे खामगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवदेन सादर करण्यात आले. या निवेदनात मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, लाठीचार्जचे आदेश देणार्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जावी. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा. यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. 

या निवेदनावर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, शहराध्यक्ष सरस्वतीताई खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, विजय काटोले, भारती पाटील, सुरजीत कौर, कृउबास सभापती सुभाष पेसोडे, माजी नगरसेवक किशोर भोसले, रोहित राजपूत, विश्वपाल जाधव, डॉ. सदानंद धनोकर, पंजाबराव देशमुख, सुरेशसिंह तोमर, श्रीकृष्ण टिकार, विलास इंगळे, प्रमोद चिंचोळकर, गणेश ताठे, चैतन्य पाटील, प्रितम माळवंदे, श्रीकृष्ण धोटे, मुन्ना बोंद्रे, राजेश जोशी आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Congress march in Khamgaon to protest attack on Maratha protesters, protests in front of Sub-Divisional Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.