पेट्रोल पंपासमोर काँग्रेसचे निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:43 AM2021-06-09T04:43:08+5:302021-06-09T04:43:08+5:30
सर्वप्रथम मेहकर शहरातील अग्रवाल पेट्रोल पंप, सेठी पेट्रोल पंप व शेवटी सत्यजित पेट्रोल पंप या तीन ठिकाणी हे आंदोलन ...
सर्वप्रथम मेहकर शहरातील अग्रवाल पेट्रोल पंप, सेठी पेट्रोल पंप व शेवटी सत्यजित पेट्रोल पंप या तीन ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसच्या राजवटीत इंधन दराच्या दुपटीपेक्षा जास्त भाव मोदी सरकार लोकांकडून घेऊन जनसामान्यांची लुबाडणूक करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ॲड. अनंतराव वानखेडे, शहराध्यक्ष कलीम खान, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे, जिल्हा उपाध्यक्ष स्वाती पऱ्हाड, जिल्हा काँग्रेसचे सचिव वसंतराव देशमुख, भीमशक्तीचे नेते भाई कैलास सुखधाने, काँग्रेस नेते भूषणभैया देशमुख, सेवादलचे प्रदेश सरचिटणीस शैलेश बावस्कर, एनएसयूआयचे प्रदेश सचिव वसीम कुरेशी, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायकराव टाले, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भरत अल्हाट, महिला शहराध्यक्ष आरती दीक्षित, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप बोरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.