काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:22 AM2021-06-27T04:22:39+5:302021-06-27T04:22:39+5:30
बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील १३ तालुक्यात शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध ...
बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील १३ तालुक्यात शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत चिखली येथील जयस्तंभ चौकात मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करून निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौकात राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आंदोलनात सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशनमध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायतराज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. याचा मोठा परिणाम होत असून संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसी करिता राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील ओबीसींमध्ये असंतोष पसरला आहे. मंडळ आयोग व ७३ आणि ७४ घटनादुरुस्तीनुसार ओबीसींना विविध पातळीवर आरक्षण दिले आहे़ त्यामुळे त्यांचे आरक्षण कायदेशीर असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. ओबीसी प्रवर्गातील वंचितांना लोकशाही प्रक्रियेत राज्य संस्थांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे असल्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, दीपक देशमाने, नंदकिशोर सवडतकर, अ. रफीक अ. कादर, डॉ. सत्येंद्र भुसारी, डॉ.मो.इसरार, डॉ. अमोल लहाने, प्रदीप पचेरवाल, अॅड. प्रशांत देशमुख, नासीर सौदागर, अॅड. विलास नन्हई, बंडू कदम, आदींसह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. प्रास्ताविक गजानन खंडारे, सूत्रसंचालन डॉ.सत्येंद्र भुसारी तर आभार प्रदर्शन डॉ. अमोल लहाने यांनी मानले.