केंद्र सरकारविरुद्ध काॅंग्रेसचे निषेध आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:22 AM2021-06-27T04:22:43+5:302021-06-27T04:22:43+5:30

सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली हाेती़; परंतु त्यांनी ती सादर केली नाही़. त्यामुळेच सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसींचे ...

Congress protests against the central government | केंद्र सरकारविरुद्ध काॅंग्रेसचे निषेध आंदाेलन

केंद्र सरकारविरुद्ध काॅंग्रेसचे निषेध आंदाेलन

Next

सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली हाेती़; परंतु त्यांनी ती सादर केली नाही़. त्यामुळेच सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे़. याला सर्वस्वी जबाबदार तत्कालीन फडणवीस सरकार व केंद्रातील माेदी सरकारच असल्याचा आराेप काॅंग्रेसने केला आहे. त्यासाठी बुलडाणा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सर्वप्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हा काँग्रेस मुख्यालयात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जयस्तंभ चौक, बुलडाणा येथे मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सतीश महेंद्रे, सुनील सपकाळ, तालुकाध्यक्ष सुनील तायडे, शहराध्यक्ष दत्ता काकस, श्लोकानंद डांगे, ॲड. राज शेख, चिंटू परसे, अमिन टेलर, सुरेश सरकटे, शेख मुजाहिद, अभय सोनोने, शेख जावेद, पल्लू गाडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Congress protests against the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.