शेगावात काँग्रेसची सरशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:05 AM2017-10-10T01:05:20+5:302017-10-10T01:05:52+5:30

शेगाव:    तालुक्यातील १0 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या  निवडणुकीची मत मोजणी स्थानिक पंचायत समितीच्या  सभागृहात पार पडली. या निकालात तालुक्यात भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षाने बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान, शेगाव  तालुक्यात काँग्रेस आणि भाजपने समान दावे ठोकल्याने  राजकीय पेच निर्माण झाले आहे.

Congress in Shega! | शेगावात काँग्रेसची सरशी!

शेगावात काँग्रेसची सरशी!

Next
ठळक मुद्देकाँग्रेस आणि भाजपने समान दावे ठोकल्याने  राजकीय पेच

फहीम देशमुख। 
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव:    तालुक्यातील १0 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या  निवडणुकीची मत मोजणी स्थानिक पंचायत समितीच्या  सभागृहात पार पडली. या निकालात तालुक्यात भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षाने बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान, शेगाव  तालुक्यात काँग्रेस आणि भाजपने समान दावे ठोकल्याने  राजकीय पेच निर्माण झाले आहे. सरपंच पदाच्या १0 पैकी ६   काँग्रेस, २ भाजपा  तर २ ठिकाणी अपक्ष निवडून आले आहे.   गेले काही दिवस लागून राहिलेली ग्रामीण भागातील पहिल्या ट प्प्यातील उत्सुकता संपली आहे. सर्व ग्रामपंचायतींमधील सत्तेचे  चित्र स्पष्ट झाले असून, या निकालात अनेक ग्रामपंचायतीत ध क्कादायक निकाल लागल्याचे पाहायला मिळाले.
या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वैशिष्ट्य असे की, या  निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच निवड होत  आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ७ ऑ क्टोबरला मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल आज  सोमवारी लागला. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षाच्या  नावावर नसल्या तरी कार्यकर्त्यांवर मात्र पक्षांचे हक शिक्के  असल्याचे जाणवले. निकाल लागताच तो या पक्षाचा तो त्या  पक्षाचा ही भाषा ऐकावयास मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस  पक्षाला मोठे यश मिळाले. येऊलखेड, कठोरा, चिंचखेड,  सगोडा, आणि माटरगाव खु. या पाच ग्रामपंचायतीवर त्यांनी दावा  केला आहे. तर भारिपने पाळोदी ग्रामपंचायतीवर दावा केला हो ता; मात्र हा दावा सरपंचांनी खोडून काढल्याची माहिती आहे.  भाजपाने खातखेड आणि कुरखेड या ग्रामपंचायतीवर दावा  केला तर निवडून आल्यानंतर कठोरा आणि येऊलखेड येथी  सरपंच भाजपाच्या आश्रयात पोहचले असल्याचे सांगण्यात  आले; मात्र लगेच दुसरीकडून या सरपंचांनी हा दावा खोडून  काढला आहे. भारिपचे स्थिती ही तशीच झाली पाळोदी ग्रा. प.  वर भारिपचा झेंडा कायम झाल्याचे वृत्त देण्यात आले; मात्र सर पंचांनी आपण स्वतंत्र असल्याचे सांगितले. भारिपचे जिल्हाध्यक्ष  राजाभाऊ भोजने यांच्या कन्येला तिव्हाण येथे पराभवाला सामोरे  जावे लागले. शेवटी भारिपचे पारड्यात एकही सरपंच आला  नाही.

सत्कार स्वीकारून दिला नारळ!
शेगाव: सरपंच निवडून आल्यानंतर प्रत्येक पक्ष त्या विजयी  उम्मेदवाराला आपला माणूस म्हणून संबोधण्यास पुढे येत आहे.  यात भाजपाने तालुक्यातील ४ सरपंचाचे सत्कार स्थानिक विश्रम  भवन आणि खामगावात केले; मात्र सत्कार संपताच यातील  दोघांनी पक्षाबाबत हात वर केल्याचे समजते. तालुक्यातून १0  पैकी १ ठिकाणी भाजपा स्पष्ट विजय मिळाला. तर लासुरा,  येऊलखेड, आणि कुरखेड येथे निवडून आलेले सरपंच यांनी  भाजपात प्राथमिक सदस्यत्व स्वीकारल्याचे सांगितले; मात्र बाहेर  पडताच यातील दोघांनी आपल्याला आमदार साहेबांनी स त्कारासाठी बोलावले होते. सत्कार हा विषय वेगळा आहे; मात्र  आपला भाजपाशी संबंध नसल्याचे त्यांनी काँग्रेस पक्षाकडे स्पष्ट  केले. यामुळे नवनिर्वाचित सपरांचांनी सत्कार स्वीकारून नारळ  दिल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे.  

Web Title: Congress in Shega!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.