महागाई धोरणाविरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:58+5:302021-07-15T04:23:58+5:30

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक जयस्तंभ चौकातील पेट्रोल ...

Congress signs campaign against inflation policy! | महागाई धोरणाविरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम !

महागाई धोरणाविरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम !

Next

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक जयस्तंभ चौकातील पेट्रोल पंपावर दरवाढीविरोधात स्वाक्षरी अभियान राबवत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.

यावेळी राहुल बोंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, प्रदेश संयोजक भाई प्रदीप अंभोरे, तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, बाळू साळोख, डॉ.सत्येंद्र भुसारी, ज्ञानेश्वर सुरूशे यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनात जितेंद्र राजपूत, शिवनारायण म्हस्के, गजानन गायकवाड, प्रशांत देशमुख, शे.जाकीर शे.यासीन, श्रीराम जुमडे, परशराम राठोड, अजाबराव इंगळे, डॉ.म.इसरार, रफीक कुरेशी, समाधान गीते, प्रमोद कुटे, शिवदास मोहिते, अमीनखॉ उस्मानखॉ, संतोष खरात, विजय गाडेकर, किशोर कदम, पप्पू जागृत, एन.टी.भुसारी, रामेश्वर भुसारी, मधुकर कुटे, रामदास मोरे, डॉ. अमोल लहाने, राजीक जमादार, सागर भालेराव, निलेश बोराडे, संजय गिरी, प्रवीण पाटील, प्रकाश लोखंडे, ज्ञानेश्वर पचांगे, समाधान आकाळ, भारत गवई, शहेजादअली खान, म.जका आझम, इम्रानखान, ज्ञानेश्वर सपकाळ, विजय राठोड, प्रकाश चव्हाण, प्रकाश राठोड, समाधान डोंगरदिवे, रघुनाथ दांडगे, कैलास वाघ आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महागाईने सर्वसामान्य त्रस्त

जनतेला भूलथापा देत सत्तेवर आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा हिरमोड केला असून वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जीवन जगणे अवघड झाले असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान सरकारविरोधी घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Web Title: Congress signs campaign against inflation policy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.