समृद्धी महामार्गाविरोधात काँग्रेस छेडणार आंदोलन
By admin | Published: September 6, 2016 02:12 AM2016-09-06T02:12:49+5:302016-09-06T02:12:49+5:30
शेतक-यांच्या विरोधाची दखल; मेहकर येथील बैठकीतून दिशा ठरविणार.
चिखली(जि. बुलडाणा), दि. ५ : मलेशियानंतर आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाच्या नागपूर - मुंबई 'सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे' मुळे मार्गावरील शेतकर्यांच्या जमिनी जाणार असून, काही गावेही यात विस्थापित होणार आहेत. त्यामुळे हा मार्ग शेतकर्यांसाठी विनाशाचा मार्ग ठरणार असल्याने या सर्व शेतकर्यांचा आक्रोश समजून घेऊन त्यासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी मेहकर येथे महामार्ग शेतकरी संघर्ष समितीने बैठक आयोजित केली असून, या शेतकरी लढय़ाचे नेतृत्व करण्यासाठी आमदार भाई वीरेंद्र जगताप, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आ.राहुल बोंद्रे, बुलडाणा आमदार हर्षवर्धन सपकाळ, रिसोड आमदार अमित झनक, यांची या बैठकीस विशेष उपस्थिती राहणार आहे.
मेहकर येथील डोणगाव रोडस्थित गजानन महाराज मंदिर सभागृहात ७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. नागपूर ते मुंबई या द्रूतगती महामार्गामुळे अमरावती, वाशिम, बुलडाणा या जिल्हय़ातील विशेषत: वाशिम, बुलडाणा या जिल्हय़ातील शेती मोठय़ा प्रमाणात अधिग्रहीत केल्या जाणार आहे. त्यात अनेक गावे विस्थापित होणार आहेत. विस्थापित होणार्यांची मनोभूमिका जाणून घेऊन व या शेतकर्यांची संपूर्ण ताकद पणाला लावून हा शेतकरी जीवनातून उठविण्याचा डाव सर्व मिळवून उधळून लावण्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्यावतीने देण्यात आली असून, याबाबत व्या पक चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून, या बैठकीस शेतकर्यांनी मोठय़ा सं ख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महामार्ग शेतकरी संघर्ष समिती, बुलडाणाद्वारे करण्यात आले आहे.