काँग्रेसच्या जि.प. व पं.स. सर्कलनिहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:12+5:302021-04-14T04:32:12+5:30
काँग्रेसच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोविड हेल्पलाईन सेंटरचा तळागाळातील जनतेला लाभ व्हावा व त्यांच्याशी थेट संपर्क साधता यावा, या ...
काँग्रेसच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोविड हेल्पलाईन सेंटरचा तळागाळातील जनतेला लाभ व्हावा व त्यांच्याशी थेट संपर्क साधता यावा, या अनुषंगाने जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उंद्री जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राम डहाके, पंचायत समिती प्रमुख मुकेश भंडारे, करवंड पं.स. प्रमुख प्रदीप कोल्हे, अमडापूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख ज्ञानेश्वर सुरूशे, पं.स.प्रमुख अ.कमर अ.अजिस, कव्हळा पं.स. प्रमुख शिवणारायण म्हस्के, इसोली जिल्हा परिषद सर्कल प्रमुख लक्ष्मण अंभोरे, पं.स. प्रमुख माधवराव खरे, मंगरूळ नवघरे पं.स. प्रमुख किशोर सोळंकी, सवणा जि.प. सर्कल प्रमुख अंजू ठेंग, सवणा पं.स. प्रमुख शेख ताहेर शेख सेटजी, शेलुद पं.स. प्रमुख प्रदीप मोरे, केळवद जि.प.प्रमुख जगन्नाथ पाटील, केळवद पं.स. प्रमुख बाबूराव देशमुख, गोदरी पं.स. प्रमुख देविदास लोखंडे, मेरा बु. जि.प. सर्कल प्रमुख अशोकराव पडघान, मेरा बु.पं.स. प्रमुख विद्धल इंगळे, कोलारा पं.स. प्रमुख गणेश म्हस्के, मेरा खुर्द जि.प. सर्कल प्रमुख समाधान परिहार, मेरा खुर्द प.स. प्रमुख भानुदास थुट्टे, शेळगाव अटोळ पं.स. प्रमुखपदी रामराव बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़