कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काॅंगेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:49+5:302021-06-22T04:23:49+5:30

विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन बुलडाणा : राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी व बुलडाणा जिल्हा किसान ...

Congress's demand for repeal of agricultural laws | कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काॅंगेसचे धरणे

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काॅंगेसचे धरणे

Next

विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

बुलडाणा : राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी व बुलडाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी धरणे आंदाेलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारद्वारे शेतकरी कायदे २०२० अमलात आले असून, त्या कायद्यांविरोधात दिल्ली येथे शेतकरी मागील सहा महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. केंद्र सरकारचे हे शेतकरी कायदे अन्यायकारक असून, या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील २०० दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा देखावा केला; पण कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. शेतकरी कृषी कायदे मंजूर करताना संसदेमधे कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. केंद्र शासनाचे हे शेतकरी अन्यायकारक कायदे रद्द करावेत व शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष बालगजानन ऊर्फ राजू पाटील, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, मनीषा पवार, ज्योती पडघान, स्वाती वाकेकर, काँग्रेस नेते रामविजय बुरंगले , लक्ष्मणराव घुमरे, ॲड. जयश्री शेळके, सतीश महेंद्रे, दत्ता काकस, सुनील सपकाळ, समाधान सुपेकर, गणेश पाटील, कलीम खान, अमेय देशमुख, अविनाश उमरकर, अर्जुन घोलप, डाॅ. भुसारी, नीलेश अंजनकर, डाॅ. इसरार जमादार, वसीम कुरेशी, दीपक सलामपुरीया, नाना देशमुख, दिलीप जाधव, देवानंद पवार, आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.

Web Title: Congress's demand for repeal of agricultural laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.