घाटाखाली काँग्रेसचा आक्रोश मोर्चा!
By admin | Published: August 31, 2016 01:17 AM2016-08-31T01:17:55+5:302016-08-31T01:17:55+5:30
खामगाव सह घाटाखालील तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभाराविरोधात एल्गार!
खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३0: कष्टकरी सामान्य वर्ग विविध समस्यांनी त्रस्त असताना शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात भाराकाँच्यावतीने मंगळवारी घाटाखालील नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
भाजपा शासनाने गोरगरीब जनतेला मिळणार्या योजनांमध्ये जाचक अटी व निकष लावून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार्या लाभापासून वंचि त ठेवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या सरकारचे हे कसले अच्छे दिन हे तर लुच्चे दिन असा घणाघात बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी केले.
आक्रोश मोर्चानंतरच्या सभेत ते बोलत होते. यावेळी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या सभेच्या मंचावर मोर्चाचे नेतृत्व आ.राहुल बोंद्रे, पक्षनिरीक्षक रमेशचंद्र घोलप, पक्षनेते रामविजय बुरूंगले, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील, खालीकबाप्पु देशमुख, संजय उमरकर, अँड. ज्योती ढोकणे, रंगराव देशमुख, डॉ. स्वाती वाकेकर, खंडारे, अंबादास बाठे, कैलास बोडखे, विठ्ठल खोद्रे, राजीव घुटे, पूजा पाटील, परवीन देशमुख, अच्छेखा हबीबखा, अविनाश उमरकर, डॉ.एस.के.दलाल, सुनील येनकर, प्रवीण भोपळे, राजू पाटील, युनूस खान, अर्चना घोलप, लता तायडे, उर्मिला पलन, प्रतिभा पाटील, युसूफ मेंबर यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसंग्रामचे अजय पारस्कर, गोपाल घुळे, चंद्रभान दाते यांच्यासह १८ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.