‘कमबॅक’ साठी काँग्रेसची कसरत

By admin | Published: October 5, 2014 12:53 AM2014-10-05T00:53:02+5:302014-10-05T00:59:49+5:30

मेहकर मतदारसंघात शिवसेनेला मार्ग सोपा नसल्याचे चित्र.

Congress's workout for 'Comeback' | ‘कमबॅक’ साठी काँग्रेसची कसरत

‘कमबॅक’ साठी काँग्रेसची कसरत

Next

मयुर गोलेच्छा / लोणार (बुलडाणा)

        मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेबरोबरच काँग्रेसची ताकद समान असल्यामुळे शिवसेनेला यावेळेस नेहमीप्रमाणे मार्ग सोपा नाही. तर काँग्रेसला या मतदार संघात गतवैभव प्राप्त करावयाचे असेल तर ह्यकमबॅकह्णसाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघावर २0 वर्षापूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने सात त्याने या मतदारसंघात चढत्या मताधिक्याने विजय संपादन केल्यामुळे मेहकर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नावरुपास आला, तो आजपर्यंंत कायम आहे. लोकसभा निवङणुकीत झालेला प्रचार हा विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला होता. तेव्हा सेनेला भाजप, रिपाइं, आठवले गट व इतर मित्रपक्षाशी सोबत होती. त्यावर पुढील गणिते बांधली गेली. सेनेने जोरदार मुसंडी मारत २५ हजार मतांची आघाडी घेतली. त्यामुळे आघाडीच्या गटात नैराश्याचे वा तावरण दिसून येत होते. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती आणि आघाडी तुटल्याने हे मित्रपक्ष विधानसभेसाठी ऐकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सेनेला आतापर्यंत आघाडीतून राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी लढतांना एकतर्फी विजय मिळत होता. परंतु आता सेनेची थेट लढत काँग्रेसच्या उमेदवाराशीच होणार असल्याने काँग्रेसला सेनेच्या धनुष्यबाणाला रोखण्यासाठी जोरदार तयारी करावी लागणार आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार संजय रायमुलकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांनी भविष्याचा विचार करुन गेल्या ५ वर्षात मतदारसंघात जनसंपर्क साधण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीकडून अश्‍विनी आखाडे उमेदवार आहेत. लोकसभा आणि नगरपालिकेत झालेला पराभव यामुळे राष्ट्रवादी चांगली ह्यबॅकफुटह्णवर गेलेली आहे. शिवाय कमकुवत संघटनामुळे १५ वर्षांपासून सातत्याने होणार्‍या पराभवामुळे राष्ट्रवादीकडून फारशा काही आशा नाही. तसेच मित्रपक्ष काँग्रेसही निवडणुकीच्या रणात असल्यामुळे राष्ट्रवादीची वाट तशीही बिकटच आहे. त्याचबरोबर भाजप ३५ वर्षानंतर प्रथमच स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. गेल्या ३५ वर्षात एकदाही मतदार संघातील एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपला स्वबळावर सत्ता मिळविता आली नाही हे विशेष. मतदारसंघात भाजपची अवस्था असून, नसल्यासारखी असतांनाही निवडणुक स्वबळावर लढविण्याची जोखीम भाजपने पत्कारली आहे. मतदारसंघात जोशात असलेल्या सेनेला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने गटबाजी विरहित आणि नियोजनबद्ध प्रचार करणे फायद्याचे ठरेल? असाही मतप्रवाह आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सर्व उमेदवार आपले चिन्ह घेऊन प्रचारासाठी जोमाने लागले असून, आगामी दहा दिवस प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण कोणावर भारी पडतो, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.

Web Title: Congress's workout for 'Comeback'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.